गृह मंत्रालय
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकनपत्रे पाठवण्याची मुदत 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढवली
प्रविष्टि तिथि:
20 AUG 2020 6:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2020
देशाच्या एकता आणि अखंडतेत योगदानाबद्दल देण्यात येणारा सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकन प्रक्रियेला आता 31.10.2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या https://nationalunityawards.mha.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने केंद्र सरकारने हा पुरस्कार सुरू केला आहे. राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला चालना देण्यासाठी आणि बळकट व अखंड भारताचे मूल्य अधिक दृढ करण्यासाठी उल्लेखनीय आणि प्रेरणादायी योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.
पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे -


* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1647389)
आगंतुक पटल : 155