विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

डीएसटीकडून कार्बन शोषण, उपयोगिता आणि साठवणुकी संदर्भातील (सीसीयूएस) उपयोजित संशोधनास प्रोत्साहन


सीसीयूएस जागतिक स्वच्छ ऊर्जेसंदर्भातील 24 देश आणि युरोपीय संघाचा उपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यात सक्रीय भागीदार

Posted On: 20 AUG 2020 4:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2020

 

कार्बन शोषण, उपयोगिता आणि साठवणुकीसंदर्भात (सीसीयूएस) उपयोजित संशोधनात रस असणार्‍या संशोधकांना आता जागतिक हवामान बदलाच्या वाढत्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांचे तंत्रज्ञान आणि संशोधन कार्य वेगवान आणि परिपक्व करण्याची मोठी संधी आहे.

सीसीयूएस ही मिशन इनोव्हेशन कार्यक्रमांतर्गत (एमआय), 24 देश आणि युरोपीय संघटनेचा उपक्रम आहे, याअंतर्गत जागतिक स्वच्छ ऊर्जा संशोधनाला चालना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग सक्रीय भागीदार आहे. डिएसटीने सीसीयूएसअंतर्गत 19 संशोधन आणि विकास प्रकल्पाला आर्थिक निधी पुरवला आहे, यात 13 देशांची भागीदारी आहे.

सध्या, डिएसटीने एसीटी ( Accelerating CCUS Technologies ) सदस्य देशांसमवेत सीसीयुएस तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी भारतीय संशोधकांकडून प्रस्ताव मागवले आहेत. अनुदानाद्वारे कार्बन शोषण, उपयोगिता आणि साठवणुकीसंदर्भातील उपयोजित संशोधनातून नवोन्मेष आणि संशोधन कृतीसाठीचा हा उपक्रम आहे. एसीटीसमवेत सोळा देश जागतिक दर्जाच्या संशोधन आणि विकासासाठी निधी पुरवत आहेत, या संशोधनातून सुरक्षित आणि परवडेल असे सीसीयुएस तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे.

एसीटी नवीन संशोधन प्रकल्प किंवा आधीपासून विद्यमान पथदर्शी प्रकल्प शोधत आहे. नवीन पथदर्शी प्रकल्पांची औद्योगिक उपयोजन क्षमता सिद्ध असली पाहिजे. प्रत्येक प्रकल्प प्रस्ताव हा एसीटीनुसार भाग घेणार्‍या किमान तीन पात्र अर्जदार देश /क्षेत्रांद्वारे बनवलेला तसेच निधीप्राप्त असावा. प्रत्येक प्रोजेक्टच्या कन्सोर्टियममध्ये निर्दिष्ट थीममध्ये संशोधन आणि विकास करण्यासाठी आवश्यक कौशल्य असणे आवश्यक आहे

एटीसीमध्ये 15 सदस्यीय देश आणि संस्थांनी या तिसऱ्या प्रकल्पाचे आवाहन करत एकमेकांच्या सहकार्याने कार्य करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय व प्रादेशिक अर्थसंकल्पातून निधी वाटप केला जाईल.

एटीसी आवाहन दोन टप्प्यांतील प्रक्रिया आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व-प्रस्ताव आणि दुसऱ्या टप्प्यात पूर्ण प्रकल्प प्रस्ताव. पूर्व-प्रस्ताव 10 नोव्हेंबर 2020 पर्यंत, तर पूर्ण प्रकल्प प्रस्ताव 10 डिसेंबर 2020 पर्यंत पाठवावे. पहिल्या टप्प्यातील यशस्वी प्रकल्पांना दुसऱ्या टप्प्यात प्रवेश मिळेल. पूर्ण प्रस्तावासाठीचा अंतिम दिनांक 15 मार्च 2021 आहे. प्रकल्पांसाठी लक्ष्यित तारीख सप्टेंबर 2021 अखेरपर्यंत आहे.

[इच्छुक भारतीय सहभागितांनी अधिक माहितीसाठी www.dst.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा डॉ निलिमा आलम, वैज्ञानिक ई, टीएमटी (ईडब्ल्यु & ओ) यांच्याशी neelima.alam[at]nic[dot]in या ईमेलवर किंवा एसीटी संकेतस्थळ www.act-ccs.eu संकेतस्थळाला भेट द्यावी]

 

* * *

M.Chopade/S.Thakur/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1647291) Visitor Counter : 188