गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांना राष्ट्रीय भरती यंत्रणा (NRA) स्थापन करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिल्याबद्दल धन्यवाद दिले
भारताच्या युवा वर्गासाठी मौल्यवान दिवस
“भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता याची खात्री देत पंतप्रधानांनी देशभरातील रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना रोजगाराचा रास्त हक्क मिळवून दिला आहे.”
“राष्ट्रीय भरती यंत्रणा (NRA) हे मोदी सरकारने उचललेलं अभूतपूर्व पाऊल आहे त्यामुळे भरती प्रक्रियेत एकसंध परिवर्तन घडून येईल”
“सामायिक पात्रता परीक्षेद्वारे (CET) भरती करण्याच्या अभूतपूर्व निर्णयामुळे
केंद्र सरकारी नोकर भरतीसाठीच्या नानाविध परीक्षांद्वारे येणारे अडथळे टाळता येतील”
“जिल्हानिहाय परीक्षा केंद्र, वेगवेगळ्या भाषांमधून परीक्षा आणि सामायिक पात्रता परीक्षेतील पात्रता तीन वर्ष वैध असणे अशा अनेक निर्णयांद्वारे NRA समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देईल”
“उमेदवारांवरील आर्थिक ओझे सामायिक परीक्षेमुळे टाळता येईल हा उमेदवारांना मिळणारा मोठा फायदा आहे”
Posted On:
19 AUG 2020 10:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतल्या राष्ट्रीय भरती यंत्रणेच्या निर्णयाला मंजुरी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. भारतातील युवावर्गासाठी आजचा दिवस म्हणजे मैलाचा दगड असल्याचे सांगून अमित शहा म्हणाले, या अभुतपुर्व निर्णयामुळे केंद्र सरकारी नोकऱ्यांसाठी नानाविध परीक्षा देण्याचा अडथळा सामायिक पात्रता परीक्षेमुळे टाळता येईल. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, समाजातील सर्व घटकांना राष्ट्रीय भरती यंत्रणा समान संधी देईल.
प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असेल, परीक्षा विविध भाषांमधून घेतल्या जातील आणि सामायिक पात्रता परीक्षेतील पात्रता तीन वर्षासाठी वैध असेल. विद्यार्थ्यांवरील आर्थिक ओझेही या सामायिक परीक्षेमुळे टाळता येईल, हा उमेदवारांचा मोठाच लाभ आहे. अमित शहा म्हणाले, राष्ट्रीय भरती यंत्रणा ही भरती प्रक्रियेत एकसंध परिवर्तन घडवून आणत असल्यामुळे मोदी सरकारने उचललेले हे अभूतपूर्व पाऊल आहे.
भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणून देशभरातील रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी त्यांचा रास्त हक्क मिळवून दिला आहे.
* * *
U.Ujgare/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1647218)
Visitor Counter : 167