उपराष्ट्रपती कार्यालय

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संशोधकांनी अभिनव कल्पना घेऊन पुढे यावे- उपराष्ट्रपतींचे आवाहन


दलालांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्याची गरज

उच्च शिक्षणामुळे देशात नवोन्मेशी वृत्तीला आणि स्टार्ट अप संस्कृतीला चालना मिळावी—उपराष्ट्रपतीनी व्यक्त केली अपेक्षा

संशोधन हा शिक्षणाचा आत्मा असावा:उपराष्ट्रपती

विद्यार्थ्यांमध्ये चौकटीपलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक: उपराष्ट्रपती

नव्या शिक्षण धोरणामुळे शिकवण्याची, शिकण्याची आणि संशोधनाची गुणवत्ता वाढेल: उपराष्ट्रपती

भारताने पुन्हा एकदा जागतिक शिक्षणाचे केंद्र म्हणून स्थान मिळवावे: उपराष्ट्रपती

जनतेचे जीवनमान अधिक सुखकर बनवण्यावर संशोधकांनी भर द्यावा: उपराष्ट्रपती

ARIIA-2020 (अटल अभिनव उपलब्धी क्रमवारी संस्था) च्या पुरस्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

Posted On: 18 AUG 2020 1:56PM by PIB Mumbai

 

शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. 

ARIIA-2020 म्हणजेच अटल अभिनव उपलब्धी क्रमवारी संस्थेच्या ऑनलाईन पुरस्कार सोहळ्यात ते आज बोलत होते.  शेतकऱ्यांना त्यांच्या कामाची माहिती वेळेत पुरवण्यापासून ते शेतमालासाठी शीतगृहे बांधणे आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे या सगळ्या गोष्टींसाठी संशोधकांनी पुढे येण्याची गरज आहे. असे नायडू यांनी सांगितले. 

दलालांकडून  शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवाण्याची गरज असून, त्यांच्या उत्पादनांना वाजवी दर मिळवून देणे आवश्यक आहे, असेही नायडू म्हणाले. यासाठी कृषीक्षेत्राशी सबंधित संस्था, AICTE, ICAR, NIRD आणि कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांचपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन आणण्यासाठी एकत्रित काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

देशारत भारतीय संशोधन आणि स्टार्ट अप संस्कृतीला चालना देण्यासाठी उच्च शिक्षण क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे सांगत, उपराष्ट्रपती म्हणाले की संशोधन हाचा शिक्षणाचा आत्मा असावा.  उत्कृष्ट ते साध्य करण्याची महत्वाकांक्षा आपल्या जीवनाचा मंत्र असायला हवा.

संशोधन आणि सृजनशीलतेला चालना मिळण्यासाठीचे पोषक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने शिक्षणसंस्थांननी आपले पुरुज्जीवन करावे, असा सल्ला नायडू यांनी दिला. आपली शैक्षणिक परीस्थितीतही कायम आपल्यातील चौकसवृत्तीला आणि नवनव्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने उच्च शिक्षण संस्थांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. चौकशी अभिनव मार्गाने समस्यांवर माता करण्याची भारतीयांची वृत्ती कायमच जोपासाली जावी, असे आवाहन उपराष्ट्रपती नायडू यांनी  केले .  भारताच्या नव्या शिक्षण धोरणात संशोधनाला वाव देणाऱ्या अनेक शिफारसी या धोरणात समाविष्ट करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितली. या धोरणात मांडण्यात आलेल्या दृष्टीकोनामुळे शिकवणे, शिकणे आणि संशोधन या सर्वच क्षेत्रांना शैक्षणिक दर्जा सुधारता येईल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

विद्यार्थ्यांमधील संशोधन आणि स्वयंउद्यमशीलतेला  चालना देत, ठराविक चौकटीपलीकडे विचार करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित व्हावी या दृष्टीने,तसेच, त्यांना नोकरदार बनवण्यापेक्षा नोकरी देणारी व्यक्ती बनवण्यासाठी  तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, अशी अपेक्षा नायडू यांनी व्यक्त केली. 

भारताला 20 शतकांची दैदीप्यमान परंपरा आणि संशोधकवृत्ती असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.  पिंगला, आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांसारख्या प्रसिद्ध गणितींनी शून्य आणि दशमान पद्धती सारख्या मौल्यवान संशोधनांन त्यांनी उजाळा दिला. एकेकाळी जगात विश्व गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात, नालंदा आणि तक्षशीला सारखी जागतिक दर्जाची शिक्षणकेंद्रे होती, असेही नायडू म्हणाले. भारताने बौद्धिक क्षेत्रातील नेतृत्व पुन्हा एकदा मिळवत जगाच्या  शिक्षणाचे केंद्र म्हणून स्थान निर्माण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

अटल अभिनव उपलब्धी क्रमवारी संस्थेचविषयी बोलतांना ते म्हणाले की या संस्थेने, विद्यार्थांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले  असून देशातील गुणवत्ता शोधून काढण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंपूर्ण भारतासाठी आत्मनिर्भर अभियानाची हाक दिली असून, या स्वयंपूर्णतेसाठी आपल्याला संशोधकवृत्ती वाढवून, प्रत्यक्षात वापरता येतील अशा उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत नायडू यांनी व्यक्त केले.

शास्त्रज्ञ आणि संशोधकानी नवनवी संशोधने विकसित करत, सर्व सामान्य नागरिकांचे जीवनमान अधिक सुखकर करण्यावर भर द्यावा असे आवाहन उपराष्ट्रपती नायडू यांनी केले. कृषीक्षेत्र अधिक उत्पादनशील करत, शेतकऱ्यांसाठी अधिक संपत्ती निर्माण करण्याकडेही लक्ष द्यावे असे नायडू यांनी सांगितले.

*****

M.Iyangar/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646734) Visitor Counter : 199