कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण पोर्टल स्थापन करण्यासाठी केंद्र सरकार जम्मू-काश्मीरला मदत करणार: डॉ जितेंद्र सिंग


20 जिल्ह्यांपैकी प्रत्येक जिल्ह्यात ऑनलाईन सार्वजनिक तक्रार निवारण पोर्टलसाठी डीएआरपीजी आणि जम्मू- काश्मीर सरकार यांच्यात अधिक सहकार्य

Posted On: 16 AUG 2020 6:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2020

जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक 20 जिल्ह्यात तक्रार निवारण पोर्टल स्थापित करण्यासाठी केंद्र सरकार जम्मू-काश्मीर सरकारला मदत करेल अशी घोषणा आज ईशान्य प्रदेश विकास विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणु उर्जा आणि अवकाश मंत्री, डॉ जितेंद्र सिंह यांनी केली.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या सुशासन उपक्रमांना बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण अभियान म्हणून डॉ.जितेंद्र सिंह आणि जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल यांनी केंद्रशासित प्रदेशात ऑनलाइन सार्वजनिक तक्रार निवारण पोर्टलच्या विस्ताराच्या पुढील टप्प्यातील योजनेवर दूरध्वनीद्वारे चर्चा केली.

हा उपक्रम राबविण्यासाठी, भारत सरकारचा प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग (एआरपीजी), जम्मू-काश्मीर सरकारबरोबर सुरू असलेल्या सहकार्यातून तक्रार निवारणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रकरणांची कमी कालावधीत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अखेरच्या टप्प्यातील तक्रार निवारण अधिकाऱ्यांच्या सहाय्याने "आवाज ई-अवम" पोर्टलचे नूतनीकरण करण्याच्या कामात आणखी वाढ करेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, या प्रयत्नांच्या अनुषंगाने येत्या काही दिवसांत जम्मू-काश्मीर सरकारबरोबर काम करण्यासाठी डीएआरपीजीच्या अधिकाऱ्यांचे एक प्रेरित पथक स्थापन केले जाईल.

 

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1646321) Visitor Counter : 177