संरक्षण मंत्रालय

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नौदल नवोन्मेष आणि स्वदेशीकरण संस्थेचा (एनआयआयओ) शुभारंभ

Posted On: 13 AUG 2020 7:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2020

 

संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते आज नौदल नवोन्मेष आणि स्वेदशीकरण संस्थे (NIIO) चा ऑनलाईन वेबिनारमध्ये शुभारंभ करण्यात आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती.

एनआयआयओ वापरकर्त्यांसाठी समर्पित आराखडा आणि संरक्षणक्षेत्रात स्वावलंबी होऊन आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्यासंदर्भात शिक्षण आणि उद्योगक्षेत्रासोबत नवोन्मेष आणि स्वदेशीकरणासंदर्भात संवाद साधेल.

एनआयआयओ ही त्रि-स्तरीय संस्था आहे. नेव्हल टेक्नॉलॉजी ऍक्सीलरेशन कौन्सिल (N-TAC) नवोन्मेष आणि स्वदेशीकरण हे दोन पैलू एकत्र आणेल आणि उच्च स्तरीय निर्देश पुरवेल. एन-टीएसीअंतर्गत असलेला कार्यगट प्रकल्पांची अंमलबजावणी करेल. टेक्नॉलॉजी ऍक्सीलरेशन सेल (TDAC) ची स्थापना जलद स्वदेशी उदयोन्मुख विघटनकारी तंत्रज्ञान जलदगतीने समावेशासाठी करण्यात आली आहे.

संरक्षण खरेदी प्रक्रिया मसुद्यात 2020 (DAP 20) सेवा मुख्यालयाला नवोन्मेष आणि स्वदेशीकरण संस्थेची स्थापना उपलब्ध स्रोतांमध्ये करण्याची अनुमती आहे. भारतीय नौदलाचे अगोदरपासूनच स्वदेशीकरण संचालनालय (DoI) कार्यरत आहे आणि सध्याच्या स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांवरच नवीन आराखडा आधारीत असेल, तसेच नवोन्मेषावर लक्ष केंद्रीत केले जाईल.

द्‌घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान, भारतीय नौदलाने पुढील परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या:-

  1. उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे इंडस्ट्रीअल डेव्हलपमेंट अथॉरिटी (UPEIDA);
  2. रक्षा शक्ती विद्यापीठ (RSU), गुजरात;
  3. मेकर व्हिलेज, कोची; आणि
  4. सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (SIDM).

वेबिनारमध्ये देशी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांची आरएसयूसोबत भागीदारी यासंबंधी ऑनलाईन चर्चा मंचाची स्थापना केली आणि वेबिनारमध्ये शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी भारतीय नौदलाच्या स्वदेशीकरण योजनांसंदर्भात ‘स्वावलंबन’ या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.  

 

B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1645588) Visitor Counter : 208