उपराष्ट्रपती कार्यालय

राज्यसभा कामकाजात बदलाचे वारे निश्चितपणे दिसत आहेत, अध्यक्षांचे प्रतिपादन


सदनाची उत्पादकता, संवैधानिक आउटपूट, समिती बैठकांमधील उपस्थिती यात वाढ दिसून येत आहे.

कोराना काळातील स्थानबद्धता ही आधीपेक्षा कितीतरी पटीने कामकाजात गुंतवून ठेवणारी होती, अध्यक्षांची स्पष्टोक्ती

आर्थिक बल असेल तर राष्ट्राला म्हणणे मांडता येते, उपराष्ट्रपतींचे आर्थिक व्यवस्था ताळ्यावर आणण्याचे आवाहन

2022 पर्यंतची उद्दिष्टे आणि 2030पर्यंतच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी आवाहन

नायडूंची उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष म्हणून केलेल्या कामकाजावरील पुस्तिकेचे आज अनावरण

Posted On: 11 AUG 2020 8:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑगस्‍ट 2020

 

प्रथमदर्शनी नकारात्मकता आणि विरोध असूनही गेले चार महिने कोरोनामुळे लादली गेलेली स्थानबद्धता आपल्याला पूर्वीपेक्षा कार्यरत आणि कामात गुंतवणारी ठरली, असे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष वैंकय्या नायडू यांनी आज सांगितले.  आपण आपल्या मनाला तात्काळ रिसेट करु शकलो आणि नव्या दैनंदिन परिस्थितीशी जुळवून घेउ शकलो म्हणूनच हे शक्य झाल्याचंही ते म्हणाले

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष म्हणून तीन वर्षांची कारकिर्द पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते. राज्यसभा कामकाजात काही बदलाचे वारे स्पष्ट दिसून येतात. सतत वाढत असणारी उच्च दर्जाची उत्पादन क्षमता आणि गेल्या काही सत्रात स्पष्टपणे दिसून येणारी सदनाच्या कामकाजाचे फलित यावरून हे स्पष्ट होते. तसेच  राज्यसभा समितीच्या बैठकांना प्रथमच 50% हून जास्त उपस्थिती दिसून येते .

उपराष्ट्रपती भवनात  माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आयोजित केलेल्या एका सोहळ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते  कनेक्टींग, कम्युनिकेटिंग, चेंजींग या पुस्तिकेचं आज अनावरण झालं.  माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुस्तिकेच्या   इलेक्ट्रानिक आवृत्तीचे उद्धाटन केले. 251 पानांचा ऐवज असलेल्या या प्रकाशनात नायडूंचे गेल्या वर्षभरातील कामकाज आणि व्यापक कार्याशी संबधीत 334 चित्रमय रेखाटने आहेत.

कोरोनाने सक्तीची स्थानबद्धता लादण्यापूर्वी आपल्याला महिन्याभरात 20 कार्यक्रमात हजर राहावे लागत होते, 70 सार्वजनिक सभांमधील भाषणे आणि 14 पदवीदान समारंभांना आपण उपस्थित राहिलो, असे वैंकेय्या नायडू यांनी सांगीतले. या स्थानबद्धतेच्या कालखंडात आपण या संबधीच्या जबाबदाऱ्यांचे स्वरुप तात्काळ बदलून टाकले आणि तंज्ञज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या साधनांचा, व्यासपीठांचा सर्वतोपरी वापर करत जनसंपर्क कायम राखला असेही त्यांनी स्पष्ट केले. या सक्तीच्या स्थानबद्धतेच्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे अनुभव सांगत आपण जवळपास 1600 जणांशी स्वतः फोनवर बोलून त्यांनी धीर दिला , समाजमाध्यमांचा संपूर्णपणे उपयोग करत लोकांना या परिस्थितीने अस्वस्थ न होता, स्वतःच्या दैंनदिन सवयीत छोटे बदल घडवून आणत परिस्थितीला सामोरे जाण्याची दृष्टी दिली अशी माहिती नायडू यांनी यावेळी दिली.  कोरोना विषाणू संबधीची सत्य माहिती, त्याचा संसर्ग आणि महामारीसंबधीची माहिती, त्या माहितीशी जुळवून घेणे आणि इतर लेख यासह या काळात आपण  350 ट्विट, 55 फेसबुक पोस्टस् लिहिल्याचे, त्यांनी सांगीतले. या ‘मिशन कनेक्ट‘चे फळ मिळाल्याचेही नायडू यांनी सांगीतले.

राज्यसभेच्या कामकाजाविषयी बोलताना ते म्हणाले की गेल्या तीन वर्षांमध्ये म्हणजेच 11 ऑगस्ट 2017 ला या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरआपण बदलाचे वारे अनुभवले . आपण जबाबदारी स्विकारल्यानंतरच्या भागात केलेल्या संशोधन आणि विश्लेषणात सदनाची कार्यक्षमता म्हणजेच कामकाजाचे फलित गेल्या 25 वर्षाच खालावत गेल्याचे आढळल्याचे त्यांनी सांगीतले. गेल्या 20 वर्षांमध्ये केवळ 1999 या एकाच वर्षात 100% फलित मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नायडूंनी माहिती दिली की, निवडणूकांचा एक वर्षाचा कालखंड असूनही  आपण चालवलेल्या गेल्या आठ सत्रात कामकाजातील उत्पादकता 65.50%, पर्यंत पोचल्याचे त्यांनी सांगीतले. राज्यसभेची उत्पादकता 248 व्या सत्रात 28.90%, 247 व्या सत्रात 27.30%, आणि 248 व्या सत्रात  6.80%  म्हणजेच सरासरी 35.75%,  ही वर्षाभरातील उत्पादकता होय. 

सभागृहाच्या कामकाजाची उच्च उत्पादकता ही 104 % एवढी 249 व्या सत्रात  99%ही ऐतिहासिक 250 व्या सत्रात तर 76 % ही शेवटच्या आणि 251  व्या सत्रात दिसून आली. ते म्हणाले की यामुळे 2019 मध्ये सरासरी उत्पादन क्षमता 78.42%  दिसून आली ही 2010 पासूनची सर्वात जास्त उत्पादकता आहे

संसद सदनाच्या उत्पादकतेबरोबरच बदलाचे अजून एक उदाहरण त्यानी मांडले. आपल्या अध्यक्षतेखालच्य़ा तीन वर्षात राज्यसभेत मंजूर झालेल्या 93 विधायकांपैकी 60 विधेयके गेल्या तीन सत्रात मंजूर झाली. विविध पक्षांनी उभा केलेल्या परिस्थितीत सुद्धा   राज्यसभेने तीन तलाक नागरिकत्व सुधारणा कायदा आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना कायदा यासारखे कायदे मंजूर केले असे नायडू म्हणाले.

संसदीय स्थायी समितीच्या कामकाजाचा उल्लेख करताना राज्यसभा अध्यक्ष म्हणाले की, या संदर्भातल्या सुधारणाही उल्लेखनीय आहेत. या समित्यांच्या बैठकांना 50% पेक्षा जास्त उपस्थिती गेल्या एक वर्षात प्रथमच सप्टेंबर 2019 मध्ये आढळून आली. 2019- 20 या दरम्यान ती 51.02% झाली म्हणजे   आधीच्या वर्षापेक्षा 14.28% वाढली.

सदनाच्या सर्व विभागांना  तसेच संबंधित नेतृत्वाला धन्यवाद देताना, त्यांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळेच सदनाचे कामकाज सुधारण्यास मदत झाली याचा नायडूंनी उल्लेख केला.

2022 मध्ये देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन आहे याचा उल्लेख करत नायडूंनी सर्वांना  प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नातील नवीन भारत प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि महात्मा गांधी तसेच स्वातंत्र्य युद्धात लढलेल्या इतर नेत्यांच्या आदर्शातून उभा राहिलेला भारत साकारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

आर्थिक सत्तेमुळे भारताला आपले मत मांडण्याची ताकद आधी तसेच जागतिक पटलावर आपले महत्त्व ठसवता आले असे नायडूंनी सांगितले. कोविड महामारीमुळे झालेल्या आलेल्या संकटाचा उल्लेख करून त्यामुळे देशाला अपेक्षित उद्दिष्ट गाठता आलेले नाही असे सांगत नायडूंनी वेगवेगळ्या क्षेत्रात 2022पर्यंतचे   उद्दिष्ट गाठण्यासाठी तसेच 2030 मध्ये शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे नायडू म्हणाले.

ह्या दिशेने नव्या शिक्षण धोरण 2020चा  उल्लेख करताना नायडूंनी प्राथमिक शिक्षणात मातृभाषेला महत्त्व देण्याच्या धोरणाचा उल्लेख केला.

कृषी क्षेत्र अधिक उत्पादनक्षम बनवण्यासाठी आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा योग्य उपयोग करण्यावरही त्यांनी भर दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी देश बदलत असल्याचे त्यांनी सांगितले ठाम निर्धार आणि एकत्रित प्रयत्न यांच्यामुळे श्रेष्ठ भारत स्वस्थ भारत आणि आत्मनिर्भर भारत हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन त्यांनी केले

 

* * *   

M.Jaitly/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645166) Visitor Counter : 199