उपराष्ट्रपती कार्यालय

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींकडून नागरिकांना शुभेच्छा

Posted On: 11 AUG 2020 6:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑगस्‍ट 2020
 

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उपराष्ट्रपतींचा शुभेच्छा संदेश खालीलप्रमाणे:

मी आपल्या देशातील सर्व नागरिकांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.  

भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणून उपासना करण्यात येणाऱ्या भगवान विष्णूचा जन्मोस्तव म्हणून जन्माष्टमी साजरी केली जाते. बाल श्रीकृष्णाच्या कथांमधील लोणी चोरणे, आपल्या सवंगड्यांसोबत खेळणे, गावकऱ्यांना त्रास देणे आणि भयंकर पर्जन्यवृष्टी पासून गोकुळ गावाला वाचविणे व कालिया मर्दन यासारख्या साहसी कृत्यांनी आम्हाला नेहमीच मोहित केले आहे. भगवान श्रीकृष्णाने भगवद्ग गीते मध्ये दिलेला फळाची अपेक्षा न करता आपली कर्तव्ये पार पाडण्याचा शाश्वत संदेश संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणादायी आहे. 

यावर्षी भारत आणि जगात कोविड-19 साथीच्या आजाराविरुद्धची लढाई सुरु असल्याने आम्हाला जवळपास आमचे सर्व पारंपारिक सण घरी राहूनच साजरे करावे लागत आहेत. सामान्यत: देशभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी होणारी जन्माष्टमी यावर्षी मास्क घालून, शारीरिक अंतर ठेवून आणि आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून साधेपणाने साजरी करावी लागेल. 

या शुभदिनी आपण सर्वानी आपली कर्तव्ये पार पाडण्याचा व नीतिमत्तेचा मार्ग अवलंबण्याचा संकल्प करूया. हा सण आपल्या देशात शांतता, सलोखा, सुसंवाद आणि समृद्धी आणेल अशी आशा करूया.


* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645121) Visitor Counter : 119