रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेच्या 83 महिला आरपीएफ-उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण

Posted On: 10 AUG 2020 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020

 

भारतीय रेल्वेच्या 83 महिला उपनिरीक्षकांच्या तुकडीची (तुकडी क्र. 9A) पासिंग आऊट परेड आज रेल्वे संरक्षण दल प्रशिक्षण केंद्र, मौला अली येथे पार पडली. 

सुश्री चंचल शेखावत यांना बेस्ट कॅडेट आणि बेस्ट इन इनडोअर म्हणून गौरवण्यात आले, तर स्मृती बिश्वास ‘बेस्ट इन आउटडोर निवडण्यात आले. परेडचे संचलन चंचल शेखावत यांनी केले.

याप्रसंगी बोलताना, गजानन मल्ल्या म्हणाले की, महिला उपनिरीक्षकांना समर्पणाच्या भावनेतून कर्तव्यपूर्ती करुन रेल्वेची संपत्ती आणि रेल्वे प्रवाशांचे रक्षण करावे लागेल. विशेषतः महिला आणि बालकांची वाढती तस्करी पाहता, समाजातील सर्वात जोखीमयुक्त गटाकडे लक्ष पुरवावे लागणार आहे. त्यांनी युवा महिला कॅडेटसचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या उपनिरीक्षकांचे 9 महिन्यांचे इनडोअर आणि आऊटडोअर असे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. प्रशिक्षणादरम्यान अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आज त्यांनी परेडमध्ये सहभाग घेतला आणि प्रतिज्ञेनंतर त्या रेल्वे संरक्षण दलाच्या घटक झाल्या. 

आजची परेड कोविड-19 संबंधीचे शारीरिक अंतर आणि इतर निकषांचे पालन करत आयोजित करण्यात आली होती.

 

M.Chopade/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644961) Visitor Counter : 135