उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींच्या तिसऱ्या वर्षाच्या कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या विशेष पुस्तकाचे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते होणार प्रकाशन


माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे होणार प्रकाशन

Posted On: 10 AUG 2020 9:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या तिसऱ्या वर्षाच्या कारकिर्दीचा वेध घेणारे पुस्तक, कनेक्टिंग, कम्युनिकेटींग चेंजिंग चे प्रकाशन उद्या म्हणजे 11 ऑगस्ट 2020 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी होणार आहे.

उद्या नायडू यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीला तीन वर्षे पूर्ण होतील. 

या पुस्तकाच्या ई आवृत्तीचे प्रकाशन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकश जावडेकर यांच्या हस्ते होईल. 250 पेक्षा अधिक पानांचे हे पुस्तक माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने छापले आहे.

उपराष्ट्रपती यांच्या कारकिर्दीतील विविध घटना, कामे त्यांचे देश-विदेशातील दौरे यांची चित्रमय माहिती या पुस्तकात संकलित करण्यात आली आहे. उपराष्ट्रपतींनी शेतकरीवैज्ञानिक, डॉक्टर्स, युवक, प्रशासक, उद्योग प्रतिनिधी आणि कलाकार अशा विविध क्षेत्रातील लोकांशी साधलेल्या संवादाची माहिती आणि क्षणचित्रे देखील या पुस्तकात बघायला मिळतील.

उपराष्ट्रपतींचे परदेश दौरे, जागतिक नेत्यांशी केलेल्या चर्चा, भाषणे यांचीही माहिती या पुस्तकात आहे. 

राज्यसभा सभापती या नात्याने नायडू यांनी कामकाजात शिस्त आणली, कामाची व्याप्ती वाढवली त्याविषयी देखील पुस्तकात माहिती आहे. अखेरच्या प्रकरणात, कोविडच्या संकटकाळात, मिशन कनेक्ट’ अंतर्गत, त्यांनी समाजातील विविध व्यक्तींशी साधलेल्या संवादाबाबतची माहिती देण्यात आली आहे.

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644953) Visitor Counter : 209