विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
बेंगळुरू येथील संशोधकांनी प्रभावी हायड्रोजन उत्क्रांतीसाठी उपयुक्त अशा टिकाऊ, कार्यक्षम, परवडणाऱ्या किंमतीतील उत्प्रेरकाचा शोध लावला
Posted On:
10 AUG 2020 5:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020
हवामानबदलाविरोधातील लढ्यासाठी जीवाश्म इंधनांऐवजी पुढील पिढीचे कमी कार्बनयुक्त इंधन म्हणून हायड्रोजन ओळखले जाते. इंधन म्हणून हायड्रोजनच्या वापराचे भवितव्य हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे इलेक्ट्रोकेमिकल विभाजन सुलभ करण्यासाठी लागणाऱ्या कार्यक्षम इलेक्ट्रोकॅटिलिस्टच्या रचनेमध्ये आहे.
हायड्रोजन (एच 2) इव्होल्यूशन रिएक्शन (एचईआर) साठी इलेक्ट्रो उत्प्रेरकाची कार्यक्षमता मुख्यत्वे त्याचा टिकाऊपणा (मजबुती), इलेक्ट्रोकेमिकल प्रतिक्रियेची क्षमता कमीतकमी कमी करण्यावर आणि संश्लेषण (उत्पादन) याच्या किंमतीवर अवलंबून असते. उद्योगांमध्ये वापरण्यात येणारे प्लॅटीनम (पीटी) / कार्बन (सी) कार्यक्षम उत्प्रेरक आहेत, पण ते महाग आहेत आणि दीर्घकाळ वापरल्यास मेटल आयनवर काम करत नाहीत.
सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (सीईएनएस), या केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत स्वायत्त संस्थेतील संशोधकांनी पॅलाडिअम पीडी (II) आयन्सयुक्त नॉव्हेल सीओपी संश्लेषित केला आहे, जो एच- अॅडसॉरप्शन, आणि बेनेझ टेट्रामाईन (बीटीए) यांच्या सक्रीय साइटचा स्रोत म्हणून कार्य करतो.
दोन्ही मिळून द्वीमितीय (2D) पीडी (बीटीए)च्या माध्यमातून एच-बाँड परस्परसंवाद निर्माण करतात. हे संशोधन ‘एसीएस अॅप्लाईड एनर्जी मटेरिअल्स’ मध्ये प्रकाशित झाले आहे.
हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे विभाजन करण्याचे कार्यक्षम साधन विकसित करणे आणि सौर ऊर्जेपासून त्यासाठी आवश्यक ऊर्जा प्राप्त करणे ही आपल्या ऊर्जेच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपायांचा महत्त्वपूर्ण भाग असेल. असे प्रो. डिएसटीचे सचिव आशुतोष शर्मा म्हणाले.
M.Iyengar/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644824)
Visitor Counter : 252