सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

एमएसएमईंना दिलासा देण्यासाठी सरकारने अलिकडील काळात घेतलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था वेग घेईल: नितीन गडकरी


विविध मंत्रालय/विभाग आणि पीएसयु यांनी एमएसएमई देयके प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांनी निर्देश देण्याची गडकरींची विनंती

Posted On: 10 AUG 2020 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, एमएसएमईंची नवी व्याख्या, फंड ऑफ फंडस योजना, चॅम्पीअन्स पोर्टल, एमएसएमईंना विस्तारीत पतपुरवठा यामुळे महामारीमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला नक्कीच गती मिळेल. ते आज फिक्की कर्नाटक राज्य परिषदेने आयोजित केलेल्या एमएमएमई परिषदेत बोलत होते. त्यांनी सर्व भागधारकांना  भीती आणि नकारात्मकतेपासून दूर रहाण्याचे आवाहन केले आणि देशाला आर्थिक शक्ती बनविण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

गडकरी पुढे म्हणाले, एमएमएमईंना मदत पॅकेजमध्ये जाहीर केलेल्या 3 लाख कोटी रुपयांपैकी 1,20,000 कोटी रुपयांचे कर्ज प्रदान केले आहे.

प्रलंबित देयकांविषयी बोलताना ते म्हणाले की, सर्व मंत्रालय, विभाग आणि पीएसयूजना एमएसएमईची प्रलंबित देयके 45 दिवसांत भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना विनंती केली की, त्यांनी राज्य/केंद्रशासित प्रदेश, मंत्रालय/विभाग आणि पीएसयू यांना एमएसएमई देयके प्राधान्याने देण्यासंबंधी निर्देश द्यावे. समाधान (SAMADHAN) पोर्टलवर नोंदवण्यात आलेल्या समस्यांची बारकाईने तपासणी केली जात आहे, असे मंत्री म्हणाले. 

गडकरींनी वेबिनारमधील सहभागितांना माहिती दिली की, सरकार भू बँक आणि सामाजिक सुक्ष्म वित्त संस्था या संकल्पनांवर काम करत आहे, याचा उद्योजक आणि लहान दुकान अथवा व्यवसाय करणाऱ्यांना चांगला लाभ होईल.

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाबाबत बोलताना ते म्हणाले की हातमाग, हस्तकला, खादी उद्योग आणि कृषी-आधारीत उद्योगांना 115 महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये प्रोत्साहन दिले पाहिजे. कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रासाठी आपणास विशेष धोरणे आखण्याची गरज आहे कारण या क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे.

कर्नाटक सरकारमधील मंत्री जगदीश शेट्टर, एसबीआयचे अध्यक्ष आणि फिक्कीचे सभासद प्रतिनिधी वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.

 

 

M.Chopade/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644806) Visitor Counter : 189