केंद्रीय लोकसेवा आयोग
यूपीएससीचे नवनियुक्त अध्यक्ष, प्रा. (डॉ.) प्रदीप जोशी यांनी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
09 AUG 2020 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2020
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) नवनियुक्त अध्यक्ष, प्रा. (डॉ) प्रदीपकुमार जोशी यांनी आज केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास (डॉनईआर), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तिवेतन, अणु उर्जा आणि अवकाश राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांची भेट घेतली.
शुक्रवारी या प्रतिष्ठित आयोगाचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर जोशी यांची मंत्र्यांबरोबर ही पहिली बैठक होती.
प्राध्यापक जोशी हे उल्लेखनीय कारकीर्द असलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आहेत, या संदर्भात त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (एनआयईपीए) चे संचालक, छत्तीसगढ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांसह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. कानपूर विद्यापीठातून 1981 मध्ये वाणिज्य विषयात पीएच.डी. घेतल्यानंतर प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक म्हणून त्यांनी विविध विद्यापीठे आणि राष्ट्रीय संस्थांमध्ये 28 वर्षांहून अधिक काळ अध्यापन केले.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी यूपीएससीचे अध्यक्ष म्हणून यशस्वी आणि सफल कार्यकाळाच्या शुभेच्छा देत विश्वास व्यक्त केला की प्रा. जोशी यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि विद्वान विचारांचा आयोगाच्या कामकाजावर सकारात्मक प्रभाव पडेल.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1644747)
आगंतुक पटल : 160