सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी आणि ग्रामोद्योगकडून खादी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी अरुणाचल प्रदेशात पहिल्या रेशीम प्रशिक्षण तथा उत्पादन केंद्राची सुरुवात
Posted On:
09 AUG 2020 10:11PM by PIB Mumbai
अरुणाचल प्रदेशातील दूरस्थ गाव चुल्ल्यूमध्ये खादी आणि ग्रामोद्योगने पहिले रेशीम प्रशिक्षण तथा उत्पादन केंद्र सुरु केले आहे. सहा महिन्यांपूर्वीच संकल्पना मांडलेल्या केंद्राचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शुभारंभ होणार आहे. केव्हीआयसीने मोडकळीस आलेल्या शालेय इमारतीचे नूतनीकरण करुन हे उत्पादन केंद्र सुरु केले आहे.

हातमाग, चरखा, रेशीम रीलिंग मशीन आणि वॉर्पिंग ड्रम यासारख्या मशीनरी आल्या असून मशीन बसवण्याचे काम जोरात सुरू आहे. प्रशिक्षणासाठी चुल्ल्यू गावातील 25 स्थानिक कारागिरांची निवड करण्यात आली आहे.
केव्हीआयसी अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी चुल्ल्यू या आदिवासी गावाला फेब्रुवारी महिन्यात भेट दिली होती, त्यावेळी प्रकल्पाची रुपरेषा मांडण्यात आली. रेशीम उत्पादन आणि ग्रामीण उद्योगांच्या इतर क्रियाकलापांची मोठी क्षमता लक्षात घेऊन सक्सेना यांनी एरी रेशीमसाठी प्रशिक्षणासह उत्पादन केंद्र स्थापित करण्यास त्वरित मंजुरी दिली, एरी रेशीम स्थानिक आदिवासी परिधान करतात. कोविड-19 टाळेबंदीमुळे प्रकल्पाचे काम मंदावले होते.
नुकतेच केव्हीआयसीने चुल्ल्यू गावात मध उत्पादनासाठी 250 मधपेट्या वितरीत केल्या आहेत. प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र झिरोपासून चुल्ल्यू गाव जवळच असल्यामुळे स्थानिक कारागिरांना याचा लाभ होईल.
अरुणाचल प्रदेशातील केंद्रामुळे पूर्ण परिसरातील विणकामाला चालना मिळेल. ईशान्येकडील राज्यांचे वैशिष्ट्ये असलेल्या एरी रेशीममुळे स्थानिक कारागिरांना रोजगार मिळेल आणि शाश्वत विकास साध्य होईल. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या “आत्मनिर्भर भारत” व्हिजनशी हे निगडीत असल्याचे सक्सेना म्हणाले. केव्हीआयसी ऑनलाईन पोर्टलवर उत्पादनांच्या विपणनासाठी विशेष पेज सुरु करण्यात येणार आहे.
केव्हीआयसी एनआयएफटी शिलाँग, एनआयडी जोरहाट आणि स्थानिक डिजाईन्सरच्या सहाय्याने आदिवासी युवकांसाठी आधुनिक डिझाईन विकसित करणार आहे.
केव्हीआयसी सुरुवातीच्या काळात कच्चा माल, प्रशिक्षण आणि मजुरीवरील खर्च आणि नवीन डिझाइनच्या नमुना विकसित करण्यासाठी खर्च देखील प्रदान करेल.
***
B.Gokhale/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644663)
Visitor Counter : 171