उपराष्ट्रपती कार्यालय

छोडो भारत चळवळीचे पूर्ण उद्दिष्ट जाणून घेण्यासाठी भारत जोडो चळवळीची आवश्यकता: उपराष्ट्रपती


ऐक्य नसल्यामुळे 1,000 वर्षे देशाची लुट, नायडू यांनी व्यक्त केले दुःख

सशक्त, भावनिकदृष्ट्या एकात्मिक भारत म्हणजे विघातक शक्तींपासून सर्वोत्कृष्ट बचाव असल्याचे उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन

गरीबी, भ्रष्टाचार आणि सर्व सामाजिक दुष्कर्म दूर करण्याची प्रतिज्ञा करण्याचे नागरिकांना आवाहन

उपराष्ट्रपतींनी वाहिली स्वातंत्र्य चळवळीतील शहिदांना आदरांजली

Posted On: 09 AUG 2020 5:47PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सशक्त, भावनिकदृष्ट्या एकात्मिक भारत म्हणजे विघातक शक्तींपासून बचाव, आहे त्यासाठी भारत जोडण्याच्या चळवळीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

छोडो भारत चळवळीच्या 78 व्या वर्धापनदिनी, नायडू यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून देशावर 1000 ते 1947 दरम्यान एकतेच्या अभावामुळे झालेली परकीय आक्रमणे आणि वसाहतवादी शोषण याविषयी लिहिले आहे. एकेकाळी समृद्ध असलेल्या भारताने दीर्घकाळ सांस्कृतिक अधीनता आणि आर्थिक शोषणाच्या रुपाने मोठी किमंत चुकवली आहे, असे ते म्हणाले.

1947 मध्ये मोठ्या संघर्षाने मिळालेले स्वातंत्र्य केवळ 200 वर्षांच्या वसाहतवादाचा शेवट नव्हते तर 1000 वर्षांपासूनच्या प्रदीर्घ काळोखावरील पडदा होता, या काळात आक्रमण करणाऱ्या, व्यापारी आणि वसाहतवाद्यांनी भारतीयांमध्ये एकात्मता नसल्याचा फायदा घेतला.

उपराष्ट्रपती नायडू म्हणाले,“एकात्मतेच्या अभावामुळे दीर्घकाळापर्यंत भारताचे शोषण झाले. यापासून शिकत, सर्व भारतीयांनी आपापली सांस्कृतिक मूल्ये आणि संस्कृतींचा पाठपुरावा करताना भारतीयत्वाच्या सामायिक भावनेने बांधले जाणे आवश्यक आहे. हे राष्ट्रवादाची भावना रुजवण्यासारखे आहे. विभाजित भारताची धारणा आपल्याला अडचणीत आणणाऱ्यांसाठी सोपे लक्ष्य ठरेल. तर, सशक्त, एकत्रित आणि भावनात्मकदृष्ट्या एकात्मिक भारत आपल्यावर दुष्ट नजर ठेवणाऱ्यांपासून संरक्षण करेल.

श्री नायडू यांनी सर्वांना समानता आणि सर्वांसाठी समान संधी मिळवून भारताला एका धाग्यात विणणे आवश्यक आहे यावर भर दिला, आणि नमूद केले की एक विभाजित आणि अप्रामाणिक समाज सर्व भारतीयांचा पूर्ण क्षमतेने विकास करु शकत नाही.

1000 वर्षांपासून देशाच्या संपत्तीवर झालेल्या परकीय आक्रमणांचा झालेला परिणाम सांगताना नायडू यांनी सोमनाथ मंदिराचा संदर्भ दिला आणि मंदिराच्या पुनर्निर्मितीसाठी 925 वर्षे लागली आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर याचे बांधकाम पूर्ण झाले, तसेच अयोध्येतील मंदिरासाठी 500 वर्षे लागली, ज्याचा नुकताच पाच ऑगस्ट रोजी भूमीपूजन सोहळा झाला, असे सांगितले.  

****

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644590) Visitor Counter : 171