आदिवासी विकास मंत्रालय

ट्रायफेडने तेहतिसाव्या स्थापना दिनानिमित्त आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवण्याच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार


ट्रायफेडने मिशन मोडध्ये आदिवासी सामाजिक-आर्थिक विकासासाठी स्वत:चे व्हर्च्युअल ऑफिस नेटवर्क सुरू केले

Posted On: 07 AUG 2020 8:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2020

 

आदिवासी कल्याण मंत्रालयांतर्गत भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाने (ट्रायफेड ) 6 ऑगस्ट 2020 रोजी आपल्या तेहतिसाव्या स्थापना दिनानिमित्त आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.  या आव्हानात्मक काळात,उपक्रम आणि वाणिज्य माध्यमातून आदिवासींच्या सक्षमीकरणाच्या मोहिमेसाठी स्थिरपणे कार्य करताना  ट्रायफेडने आदिवासींना रोजगार आणि उपजीविका निर्मितीसाठी मदत करण्याचे प्रयत्न दुपटीने वाढवले आहेत.

देशभर महामारीचा प्रादुर्भाव असून  जीवनाची प्रत्येक बाब ऑनलाइन झाली असताना ट्रायफेडने  6 ऑगस्ट 2020.रोजी स्थापना दिनानिमित्त स्वत:चे व्हर्च्युअल कार्यालय सुरू केले. ट्रायफेड व्हर्च्युअल ऑफिस नेटवर्कमध्ये 81 ऑनलाइन वर्कस्टेशन्स आणि 100 अतिरिक्त कन्व्हर्जिंग स्टेट आणि एजन्सी वर्कस्टेशन्स आहेत ज्यामुळे ट्रायफेडला  देशभरातील त्यांच्या भागीदारांबरोबर काम करण्यास मदत होईल. हे संघटनात्मक उपक्रम आदिवासी व्यापाराला चालना देण्याच्या आणि तिथल्या खेड्यातील आदिवासी उत्पादक आणि कारागीरांना आंतरराष्ट्रीय दर्जानुसार अद्ययावत ई-मंच स्थापन करून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्याच्या ट्रायफेडच्या महत्वाकांक्षी सर्वसमावेशक डिजिटायझेशन मोहिमेचा एक भाग आहेत.

Description: A group of people standing around a tableDescription automatically generated   Description: A person sitting in a chairDescription automatically generated

जागतिक विजेती मेरी कोम ट्रायफेडची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनली असून आदिवासी बांधवांसाठी योगदान देत आहे. 

या संकटकाळात "गो व्होकल फॉर लोकल " हा मंत्र " बी व्होकल फॉर लोकल गो ट्रायबल - मेरा वन मेरा धन मेरा उद्यम " मध्ये रूपांतरित करून ट्रायफेडने  वनधन योजना , ग्रामीण बाजार आणि त्यांची गोदामे याच्याशी संबंधित वनवासियांच्या विविध माहितीच्या डिजिटायझेशनमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. या डिजिटायझेशन  प्रयत्नांमधून जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व आदिवासी क्लस्टर्स निवडले जातात आणि मॅप केले जातात जेणेकरून पंतप्रधान मोदींनी दिलेला “आत्मनिर्भर भारत अभियान” हाकेअंतर्गत या लोकांना लाभ मिळण्यात मदत होईल.

एमएफपी, हस्तकलेच्या वस्तू आणि हातमागच्या ऑनलाईन खरेदीसाठी आदिवासी उत्पादक - वनवासी आणि कारागीर यांच्यासाठी विशेष ई-बाजारपेठ लवकरच सुरु केली जाणार असून ट्रायफेडच्या शिरपेचात हा आणखी एक तुरा असेल. 15 ऑगस्ट 2020 रोजी सुरू होणारे ट्राइब इंडिया ई -मार्ट प्लॅटफॉर्म हे आदिवासींना त्यांच्या वस्तूंची त्यांच्या ई-शॉपद्वारे ई-बाजारपेठेत  मोठ्या संख्येने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना  विक्री करण्याची  सुविधा असेल. देशभरातील अंदाजे 5 लाख आदिवासी उत्पादकांची नोंदणी करून त्यांचे नैसर्गिक उत्पादन, हस्तकलेच्या वस्तूंचे उत्पादन करून घेण्याची ट्रायफेडची प्रक्रिया सुरु आहे.  डिजिटल पेमेंट सक्षम केल्यामुळे आदिवासी बांधवांना केवळ विस्तारित बाजारपेठेतच प्रवेश मिळू शकणार नाही तर त्यांचा पत (क्रेडिट ) इतिहास देखील सुधारता येईल.

Description: A picture containing indoor, table, room, sittingDescription automatically generated   Description: A store filled with lots of furnitureDescription automatically generated

अचानक उद्भवलेल्या महामारीमुळे आणि तत्काळ लॉकडाऊनमुळे आदिवासी कारागीरांच्या 100 कोटी रुपयांच्या वस्तू विक्रीविना पडून होत्या. या सर्व वस्तूंची विक्री सुनिश्चित करून विक्रीची सर्व रक्कम संकटग्रस्त आदिवासी कुटुंबांना मिळावी या उद्देशाने ट्रायफेडने  1 लाखाहून अधिक वस्तू खरेदी केल्या आहेत आणि या विक्री न झालेल्या वस्तूंची ऑनलाईन विक्री करण्यासाठी ट्राइब्स इंडिया संकेतस्थळावर (भरीव सवलतींसह) तसेच अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि जीईएम सारख्या इतर किरकोळ मंचावर आक्रमक योजना सुरू केली आहे.

आदिवासी जमाती आणि वनवासी आणि घरगुती आदिवासी कारागीर यांच्यासाठी रोजगार निर्मितीचा महत्वपूर्ण स्रोत बनलेले वन धन विकास केंद्र / आदिवासी स्टार्ट अप्स  हे देखील या योजनेचा भाग आहेत. 22 राज्यांतील 3.6 लाख आदिवासी जमातींना आणि 18000  बचत-गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 1205 आदिवासी उपक्रमांची स्थापना केली आहे.


* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644212) Visitor Counter : 163