केंद्रीय लोकसेवा आयोग

प्रा. (डॉ.) प्रदीपकुमार जोशी यांनी, यूपीएससीचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली

Posted On: 07 AUG 2020 8:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2020

 

सध्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य, प्रा. (डॉ) प्रदीपकुमार जोशी, यांनी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदाची  शपथ घेतली. आयोगाचे मावळते अध्यक्ष अरविंद सक्सेना यांनी प्रदीपकुमार जोशी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

प्रा. (डॉ.) जोशी यांनी 12 मे 2015 रोजी सदस्य म्हणून आयोगामध्ये प्रवेश केला. यापूर्वी जोशी त्यांनी छत्तीसगड लोकसेवा आयोग आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (एनआयईपीए) चे संचालक म्हणूनही काम पाहिले. प्रा. (डॉ.) जोशी यांनी आपल्या कारकीर्दीत पदव्युत्तर स्तरावर 28 वर्षांहून अधिक काळ शिकविले आणि विविध धोरणनिर्मिती, शैक्षणिक व प्रशासकीय संस्थांमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषविली.

आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ प्रा. (डॉ.) जोशी यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषद आणि चर्चासत्रांमध्ये संशोधन लेख  प्रकाशित आणि सादर केले आहेत. 


* * *

M.Chopade/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644203) Visitor Counter : 853