उपराष्ट्रपती कार्यालय
विद्यार्थ्यांवरील भार कमी करण्याच्या नवीन शैक्षणिक धोरणाचे उपराष्ट्रपतींकडून कौतुक
एनईपी-2020 दूरदर्शी दस्तावेज असून सर्वांगिण विकासावर भर देणारा आहे
एनईपी-2020 मातृभाषेकडे लक्ष दिल्यामुळे भारतीय भाषांचे संवर्धन आणि प्रसार होईल- उपराष्ट्रपती
Posted On:
06 AUG 2020 11:04PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज अभ्यासक्रम कमी करुन विद्यार्थ्यांवरील भार कमी होणार असल्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणाचे कौतुक केले.
पहिल्या राजलक्ष्मी पार्थसारथी स्मृती व्याख्यानमालेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करताना, विद्यार्थ्यांना शारिरीक कसरती आणि खेळाकडेही तेवढेच महत्त्व देण्यासाठी प्रवृत्त करावे, यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला. शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा, जेणेकरुन विद्यार्थी सुरुवातीपासूनच क्रीडांगण आणि वर्गखोल्यांमध्ये तेवढाच वेळ घालवतील.
योग हा मन आणि शरीर दोन्हींचा व्यायाम आहे, असे सांगत उपराष्ट्रपती म्हणाले योगाला कोणताही धर्म नाही. योग हे कला आणि विज्ञान दोन्ही आहे.
नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाला दूरदर्शी दस्तावेज असे संबोधित उपराष्ट्रपती म्हणाले, की त्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. एनईपी-2020 विद्यार्थीकेंद्री आहे आणि भारताचे उत्साही ज्ञान समुदायात रुपांतर करण्याचा याचा उद्देश आहे. यात भारताचे प्राचीनत्व आणि गौरव यांच्या समावेशनाचा योग्य समतोल साधला आहे तसेच जगातील उत्तम कल्पना आणि उत्तम विचारांचा स्वीकार असल्याचे ते म्हणाले.
एनईपी-2020 मध्ये मातृभाषेला महत्त्व दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. उपराष्ट्रपतींनी भारतीय भाषांचे संवर्धन आणि प्रसाराचे महत्व यावर भर दिला. ते म्हणाले, मी वेळोवेळी सांगितले आहे की, कोणत्याही भाषेची सक्ती करु नये आणि कोणत्याही भाषेला विरोध करु नये.
***
G.Chippalkatti/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643943)
Visitor Counter : 158