युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
एसएआयने प्राचार्य, पीई शिक्षकांसाठी खेलो इंडिया मोबाइल ऍप्प ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला
Posted On:
06 AUG 2020 10:54PM by PIB Mumbai
भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), सीआयएससीई आणि सीबीएसई या शिक्षण मंडळांच्या सहकार्याने सीआयएससीई शाळांमधील शारीरिक शिक्षण (पीई) देणाऱ्या शिक्षकांना "शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खेलो इंडिया सुदृढता मूल्यमापन ” यावर प्रशिक्षण देण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
7 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात दोन विभागातील 2615 सीआयएससीई शाळांमधील 7500 सहभागींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सदृढतेच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि तळागाळातील असंख्य प्रतिभावान मुलांमधून भविष्यातील संभाव्य विजेते ओळखण्यासाठी हे व्यापक प्रशिक्षण आयोजित केले जात आहे.
कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे , शाळा बंद आहेत आणि ऑनलाईन वर्ग किंवा वेबिनरच्या रूपाने नवीन शैक्षणिक सत्र संपूर्ण भारतात सुरू झाले आहे. या सद्य परिस्थितीत, मूळ स्वरुपात प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण (TOTs) आणि शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शारीरिक मूल्यांकन शक्य नाही जोवर मुले व शिक्षक शाळेत जायला सुरुवात करत नाहीत.
7 ऑगस्ट रोजी, विविध शाळाचे मुख्याध्यापक किंवा संस्था प्रमुख यांना खेलो इंडिया मोबाइल ऍप्प (केआयएमए) च्या माध्यमातून खेलो इंडिया तंदुरुस्ती मूल्यांकन हाती घेण्यासाठी ज्ञान, दृष्टीकोन आणि कौशल्य असलेल्या शारीरिक शिक्षण शिक्षकांना सक्षम बनविण्याच्या गरजेबद्दल प्रोत्साहित व प्रेरित करण्यात येईल. तसेच त्यांना 2020-21 साठी लक्ष्य ठरवून देण्यात येईल. या सत्राचे शीर्षक "होल स्कुल ऍप्रोच टू फिटनेस " असे आहे.
11 ते 14 ऑगस्ट दरम्यान, शालेय पीई शिक्षकांना असेसर मोबाइल अॅपचे प्रशिक्षण आणि तांत्रिक ज्ञान दिले जाईल. त्यांना खेलो इंडिया फिटनेस फॉर स्कूल गोइंग चिल्ड्रेन अँड फिट इंडिया ची ओळख करून दिली जाईल, तसेच खेलो इंडिया बॅटरी ऑफ टेस्ट्स कशी घ्यावी, खेलो इंडिया असेसमेंट्स प्रोटोकॉल, टॅलेंट आयडेंटिफिकेशन रोडमॅप, 2020-21 साठीचे उद्दीष्ट या विषयावर सत्रे आयोजित केली जातील.
ज्यांनी 2019 मध्ये ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर प्रशिक्षण घेऊन त्यांच्या शाळांचे मूल्यांकन केले आहे अशा निवडक मास्टर ट्रेनरकडून हे प्रशिक्षण दिले जाईल.
31 जुलै पर्यंत देशभरात एकूण 257 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यात आले असून 24,500 हून अधिक प्रशिक्षकांना लॉकडाऊन दरम्यान आणि नंतर प्रशिक्षित केले असून एकूण 22,450 शाळांनी नोंदणी केली आहे.
******
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643942)