संरक्षण मंत्रालय

दक्षिणी नौदल कमांडद्वारे तातडीची वैद्यकीय मदत

Posted On: 06 AUG 2020 7:57PM by PIB Mumbai

 

दक्षिणी नौदल कमांडने (एसएनसी) 05 ऑगस्ट रोजी हेलिकॉप्टरचा वापर करुन कोची येथील व्यापारी जहाजावर वैद्यकीय सुटका  केली.

05 ऑगस्ट रोजी सकाळी 1030 वाजता एमव्ही विश्व प्रेरणा या व्यापारी जहाजाचे कॅप्टन राजपाल सिंग संधू जखमी असल्याचे एसएनसीला कळाले. कॅप्टन संधू यांच्या पायाला जखम झाली असून त्यांना तातडीने कोचीला नेण्याची आवश्यकता होती. अगदी तातडीच्या सूचनेवर आयएनएस गरुडाने सी किंग हेलिकॉप्टर पाठवले. समुद्र खवळलेला असल्यामुळे जहाज हेलकावे खात होते, अशा परिस्थितीत हेलिकॉप्टरच्या पायलटसनी प्रचंड कौशल्य आणि व्यावसायिकता दाखवत रुग्णाला यशस्वीरित्या बाहेर काढले.  

रुग्णाला नंतर आयएनएस गरुड येथे आणण्यात आले, तेथून त्यांना कोविड-19 चे सर्व निकष पाळून कोची येथील मेडिकल ट्रस्ट हॉस्पीटल येथे पाठवण्यात आले. 

****

M.Chopade/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1643878) Visitor Counter : 158