सांस्कृतिक मंत्रालय

सांस्कृतिक मंत्रालयाच्या सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्राद्वारे स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील देशभक्तीपर कविता स्पर्धेचे आयोजन

Posted On: 05 AUG 2020 5:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2020


स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाच्या सीसीआरटी अर्थात सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि मायगव्ह च्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील देशभक्तीपर कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. 

राष्ट्रीय पातळीवरील देशभक्तीपर कविता स्पर्धेत भाग घेण्यासाठी 10 ते 14 वर्षे वयोगटातील प्रतिभावंत मुलांकडून “देशभक्तीपर कविता” मागविण्यात आल्या आहेत. स्पर्धेअंतर्गत मुले इंग्रजीसह भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीने मान्यता दिलेल्या कोणत्याही भाषेत आपली कविता पाठवू शकतात. प्रत्येक राज्य / केंद्र शासित प्रदेशातून जास्तीत जास्त पाच सर्वोत्कृष्ट कविता निवडल्या जातील, ज्याचे मूल्यांकन राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ समिती द्वारे केले जाईल. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विजेत्यांच्या नावांची घोषणा केली जाईल आणि विजेत्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. ज्या मुलांची जन्मतारीख 01.07.2007 ते 30.06.2011 दरम्यान आहे (दोन्ही दिवस समाविष्ट) तेच या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

सीसीआरटी 40 वर्षांहून अधिक काळ शिक्षणाला संस्कृतीशी जोडण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि आतापर्यंत 10 ते 14 वर्षे वयोगटातील तरुण आणि गुणवंत मुलांना 14,000 हून अधिक शिष्यवृत्ती देण्यात आल्या आहेत.

विजेत्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र तसेच रोख बक्षिसे देण्यात येतील. 

  1. प्रथम पुरस्कार (रु. 15,000 / -) 
  2. द्वितीय पुरस्कार (रु. 7,500 / -) 
  3. तृतीय पुरस्कार (रु. 5,000 / -)  
  4. उत्तेजनार्थ बक्षीस (रु. 2000/-) भारताच्या प्रत्येक राज्य / केंद्र शासित प्रदेशासाठी (ज्या राज्य / केंद्रशासित प्रदेशाकडून कविता प्राप्त झाल्या आहेत)

 

कविता पाठवण्याची शेवटची तारीख 07-08-2020 रोजी रात्री 11.30 पर्यंत 

नियम आणि अटी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नोंदणी आणि अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा


* * *

M.Chopade/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643568) Visitor Counter : 113