उपराष्ट्रपती कार्यालय

न्यायव्यवस्थेच्या सर्वच स्तरावरील वाढत्या प्रलंबित प्रकरणांविषयी उपराष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त


जलद आणि परवडणारा न्याय मिळावा यासाठी उपराष्ट्रपतींनी सरकार आणि न्यायपालिकेला केले आवाहन

अन्यायाला वाचा फोडू न शकणाऱ्यांचा आवाज बना; कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांना उपराष्ट्रपतींचा सल्ला

कायद्याच्या विद्यार्थ्यांनी गरिबांना कायदेशीर मदत ही वचनबद्धता म्हणून करावी

मोठे सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात वकील सक्षम आहेतः उपराष्ट्रपती

सतत आत्मपरीक्षण, छाननी आणि सुधारित कायद्यांविषयी जागरूकतेचे आवाहन

कायदे तयार करताना अस्पष्टता टाळा; कायदे सोपे असावेत, गुंतागुंतीचे नसावेत: उपराष्ट्रपती

डॉ.बी.आर.आंबेडकर आंध्र विद्यापीठाच्या विधी विद्यालयाच्या अमृत महोत्सवी संमेलनास संबोधन

Posted On: 04 AUG 2020 4:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2020

सर्वोच्च न्यायालय ते खालच्या न्यायालयांपर्यंतच्या वाढत्या प्रलंबित प्रकरणांविषयी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज चिंता व्यक्त केली आणि सरकार व न्यायव्यवस्थेला या विषयावर लक्ष वेधून वेगवान न्यायमिळवून देण्याचे आवाहन केले.

डॉ.बी.आर.आंबेडकर आंध्र विद्यापीठाच्या विधी विद्यालयाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त अमृत महोत्सवीसंमेलनास आज आभासी पद्धतीने संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी जलद आणि किफायतशीर दरात न्यायमिळण्याची गरज अधोरेखित केली. प्रदीर्घ काळ खटल्यांना स्थगिती मिळत असल्याने न्याय मिळविण्याच्याप्रक्रियेतील खर्च वाढत जातो ही बाब निदर्शनास आणून देताना त्यांनी न्यायदानाला विलंब म्हणजेच न्याय नाकारणे या उक्तीची जाणीव करून दिली.

व्यापक प्रमाणावरील सार्वजनिक हितासाठी जनहित याचिका दाखल करणे यात काही गैर नाही मात्रवैयक्तिक, खासगी आणि राजकीय हितसंबंधांसाठी जनहित याचिका (पीआयएल) असू नयेत, असेउपराष्ट्रपती यांनी यावेळी आग्रही प्रतिपादन केले.

अन्यायाला वाचा फोडू न शकणाऱ्यांचा आवाज बना आणि सामाजिक बांधिलकी म्हणून गरीबांना कायदेशीर मदत देण्याचा सल्ला नायडू यांनी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना दिला. कर्तव्य बजावताना निडर राहण्याबरोबरच व्यावसायिकता व नैतिकतेचा अंगीकार करण्यासही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

कायदे तयार करताना संदिग्धता टाळण्याच्या गरजेवर प्रकाश टाकताना उपराष्ट्रपती म्हणाले की कायदे साधे असावेत, त्यात गुंतागुंत नसावी. कायद्याचा आशय व हेतू अगदी स्पष्ट असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

जरी बरेच तरुण कायद्याच्या अभ्यासक्रमांत सामील होत आहेत आणि वकील बनत आहेत, तरीही मनुष्यबळाची कमतरता आहे. आपल्याला याची कारणे अभ्यासण्याची व त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याच वेळी हे लक्षात ठेवले पाहिजे की संख्येपेक्षा गुणवत्ता अधिक महत्वाची आहे. न्यायव्यवस्थेनेही या विषयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे ते म्हणाले.

गेल्या काही वर्षांमध्ये भारताने व्ही.आर. कृष्णा अय्यर, नानी पालखीवाला, फली एस. नरिमन, सोलीसोराबजी, हरीश साळवे, पी.बी. गजेन्द्र गडकर, कोकासुब्बा राव, के.एस. हेज आणि हंस राज खन्ना अशाअनेक नामवंत व कर्तव्यदक्ष विधीज्ञ नेमले ज्यांनी आपत्कालीन काळात लोकांचे मूलभूत हक्कजपण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

मोठे सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात वकील सक्षम आहेत. सतत आत्मपरीक्षण करून त्यांनी सुधारितकायद्यांविषयी जागरूक असले पाहिजे. अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. आपली न्यायव्यवस्थासुधारण्यासाठी अविरत प्रयत्न होणे आवश्यक आहे. कायदेशीर पायाभूत सुविधा वाढविण्याबरोबरचसामान्यांना जलद न्याय मिळवून देण्यात यावा अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.

लोकांना न्याय मिळवणे पुरेसे नाही. कायदेशीर व्यवस्थेची गुंतागुंत त्यांच्याद्वारे त्यांना बोलल्या जाणाऱ्या आणि समजल्या जाणाऱ्या भाषांमध्ये समजली पाहिजे हे देखील आपण सुनिश्चित केले पाहिजे. या प्रतिष्ठित विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून आपण समाज आणि देशाला परत देऊ शकतील असे मार्ग शोधण्याचा आपणसतत प्रयत्न केला पाहिजे. आपण कायदेशीर व्यवसायाकडे एक अभियान म्हणून पाहिले पाहिजे असेआवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

राज्यघटना ही केवळ वकीलांची कागदपत्रे नाहीत. लोकशाही व्यवस्थेचे तपशील आणि त्या संस्था आणि प्रक्रिया यांचे कार्य समजून घ्या. केवळ कायदेशीरदृष्ट्या योग्य नसून नैतिकदृष्ट्या धार्मिक आणि सामाजिकदृष्टिकोनातून धोरणे तयार करण्यात धोरण निर्मात्यांना मदत करा. भविष्यातील वकील म्हणून आपण नेहमीच सकारात्मक सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न कराल. असे नायडू यावेळी म्हणाले.

 

U.Ujgare/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643302) Visitor Counter : 283