पर्यटन मंत्रालय

पर्यटन मंत्रालयाच्यावतीने ‘‘हेरिटेज टुरिझम इन गुजरात’’ या विषयावर वेबिनार


‘देखो अपना देश’ मालिकेमध्ये 44 व्या वेबिनारचे आयोजन

Posted On: 03 AUG 2020 6:16PM by PIB Mumbai

 

पर्यटन मंत्रालयाच्यावतीने ‘देखो अपना देश’ मालिकेमध्ये ‘‘हेरिटेज टुरिझम इन गुजरात’’ या विषयावर  44 व्या वेबिनारचे दि.1 ऑगस्ट,2020 रोजी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुजरात राज्यातील पुरातन, पुरातत्व स्थळे, मध्ययुगातली भव्य स्मारके त्याचबरोबर आधुनिक वास्तू, पर्यटकांना आकर्षित करणा-या आणि वैविध्यपूर्ण वारशाची माहिती देण्यात आली.

गुजरात हेरिटेज टुरिझम असोसिएशनचे सचिव रणजीत सिंह परमार आणि लेखक, प्रवासी वर्णन आणि खाद्यपदार्थ यांच्यावर लेखन करणारे अनिल मूलचंदानी यांनी हा वेबिनार सादर केला. यामध्ये त्यांनी गुजरातमधले विविध देखणे, सुंदर किल्ले, पुरातन वाडे, हवेल्या आणि इतर ऐतिहासिक महत्व असलेली स्थाने यांची माहिती दिली. गुजरातमधल्या अनेक उत्तम हवेल्यांचे रूपांतर आता हेरिटेज हाॅटेल्समध्ये करण्यात आले आहे. तर काही वाडे, हवेल्यांमध्ये  ‘होमस्टे’ ही सेवा देण्यात येत आहे. गुजरातला जवळपास 1600 किलोमीटर लांबीची पश्चिम समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी व्यापारी वर्ग कशा पद्धतीने येथे आकर्षिक झाले, याची माहिती प्रस्तुत वेबिनारमध्ये देण्यात आली. या किनारपट्टीमुळे गुजरातमध्ये फार पूर्वीपासून व्यापारी, स्थलांतरित आणि शरणार्थीही या भागात आले आहेत.

या वेबिनारमध्ये गुजरातचा मूर्त आणि अमूर्त वारसा अधोरेखित करण्यात आली. सादरकर्त्यांनी  हेरिटेज हाॅटेल्स, होमस्टे, संग्रहालये, इथली जीवनशैली, इथे होणारे कार्यक्रम, तसेच ज्या ज्या स्थळांवर चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते, त्यांची माहिती ‘देखो अपना देश’मध्ये या वेबिनारमध्ये दिली. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या अंतर्गत भारतामधले समृद्ध वैविध्य दर्शविण्याचा प्रयत्न या आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून केला जात आहे. यामधून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गुजरातमध्ये लोथल, ढोलविरा आणि गोला धोरो येथे पुरातन सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. जगातल्या पहिल्या बंदरापैकी लोथल एक आहे, असे मानले जाते.

गुजरातमध्ये सिधापूर येथे रूद्रमलय, मोढेरा येथे सूर्य मंदिर, पालिताना येथे जैन मंदिर, तारंगा, गिरनार, माउंट आबू आणि कुंभारियाजी येथे विविध देवतांची अतिशय भव्य, देखणी हिंदू मंदिरे आहेत.

गुजरातमधले मोठे, महत्वाचे शहर अहमदाबादला ‘सिटी ऑफ वाॅल’ असे म्हणतात, या शहराची स्थापना सुलतान अहमद शाह याने इसवी सन 1411मध्ये केली साबरमती नदीच्या पूर्वे किना-यावर हे शहर वसवण्यात आले. आता हे शहर युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केले आहे.

गुजरातमध्ये अनेक सण साजरे केले जातात. यामध्ये गणेश चतुर्थी, नवरात्र आणि दिवाळी यांचा समावेश आहे. 14 जानेवारी,  म्हणजे संक्रांतीच्यावेळी येथे पंतगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथे रबारिस भरतकाम, भौमितिक रचनांचे कलात्मक कलाकारी केलेले पटोलासारखे वस्त्र येथे तयार केले जाते. तसेच दुपदरी इकत कसे तयार केले जाते, याची प्रक्रिया पाहणे, कुणीही चुकवू नये, असे वेबिनारमध्ये सांगण्यात आले.

वेबिनार इथे पाहता येतील

https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured

http://tourism.gov.in/dekho-apna-desh-webinar-ministry-tourism

https://www.incredibleindia.org/content/incredible-india-v2/en/events/dekho-apna-desh.html

 

 M.Chopade/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643193) Visitor Counter : 196