अर्थ मंत्रालय
जवळपास 87,500 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा
Posted On:
01 AUG 2020 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2020
जुलै 2020 मधे एकूण 87,442 कोटी रुपयांचा महसूल वस्तू आणि सेवा कररुपात जमा झाला. गतवर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 86%इतके आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीवर 84% महसूल मिळाला आणि गतवर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत देशांतर्गत व्यवहार ( आयातीवरील सेवा धरून )आणि या स्रोतांतून 96%इतका महसूल (वस्तू आणि सेवा कर ) जमा झाला.गेल्या महिन्यापेक्षा जास्त महसूल या महिन्यात जमा झाला. अर्थात गेल्या महिन्यात कोविड-19 मुळे दिलेल्या सवलतीमुळे मोठ्या प्रमाणावर करदात्यांनी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2020 या महिन्यांचा कर भरला होता. 5 कोटीपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या करदात्यांसाठी ही सवलत सप्टेंबर 2020 पर्यंत आहे.
एकूण महसुलापैकी 16,147 कोटी रुपये सीजीएसटी आहे तर 21,418 कोटी रुपये एसजीएसटी आहे, आयजीएसटी 42,592 कोटी रुपये (आयात वस्तूंवरील आयजीएसटी 20,324 कोटी रुपये) तर 7,265 कोटी रुपये अधिभार आहे(त्यापैकी 807 कोटी रुपये आयात वस्तूंवरील).
सरकारने 23,320 कोटी रुपयांचा सीजीएसटी , 18,838 कोटी रुपये एसजीएसटीच्या रुपात आयातीवरील जीएसटी निकाली काढला आहे.केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने निकालात काढल्यानंतर जुलै महिन्यात 39,467 कोटी रुपये सीजीएसटी तर 40,256 रुपये एसजीएसटीतून महसूलरुपात जमा झाला.
G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642917)
Visitor Counter : 203