कृषी मंत्रालय
गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप पिकांचे पेरणी क्षेत्र 13.92% ने वाढले
ज्यूट आणि मेस्ता वगळता सर्व पिकांच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ
Posted On:
31 JUL 2020 11:55PM by PIB Mumbai
भारत सरकारचा कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग कोविड – 19 साथीच्या काळात शेतकऱ्यांना आणि शेतीविषयक कामांना सोयीसाठी अनेक उपाययोजना करीत आहे.
1. खरीप पिकांच्या लागवडी खालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आली आहे, त्याची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे :
खरीप पिके अंतर्गत पेरणी क्षेत्र पुढीलप्रमाणे :
31.07.2020 पर्यंत गेल्या वर्षीच्या याच अवधीतील 774.38 लाख हेक्टर क्षेत्रफळाच्या तुलनेत यंदा 882.18 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशात पेरणी क्षेत्रात 13.92 टक्के वाढ झाली आहे. पिकांनुसार पेरणी क्षेत्र पुढीलप्रमाणे :
तांदूळ : गेल्या वर्षीच्या 223.96 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 266.60 लाख हेक्टर क्षेत्रात भात पेरणी झाली आहे.
डाळी : गेल्या वर्षीच्या 93.84 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 111.91 लाख हेक्टर क्षेत्रात डाळींची लागवड झाली आहे.
भरड धान्य : गेल्या वर्षीच्या 139.26 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 148.34 लाख हेक्टर क्षेत्रात भरड धान्याची पेरणी झाली आहे.
तेलबिया : गेल्या वर्षीच्या 150.12 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 175.34 लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची लागवड झाली आहे.
ऊस : गेल्या वर्षीच्या 51.20 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 51.78 लाख हेक्टर क्षेत्रात ऊसाची लागवड झाली आहे.
ज्यूट आणि मेस्ता : गेल्या वर्षीच्या 7.05 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 6.95 लाख हेक्टर क्षेत्रात ज्यूट आणि मेस्ताची लागवड झाली आहे.
कापूस : गेल्या वर्षीच्या 108.95 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 121.25 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली आहे. म्हणून, सर्वंकषदृष्ट्या आजच्या तारखेपर्यंत खरीप पिकांच्या पेरणीतील प्रगतीवर कोविड -19 चा कसलाही परिणाम झालेला नाही.
2. देशात 30.07.2020 पर्यंत 443.3 मिमी सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत 447.1 मिमी पाऊस झाला. म्हणजेच 01.06.2020 ते 30.07.2020 दरम्यान (+)1 टक्का अधिक पाऊस झाला. केंद्रीय जल आयोगाच्या (सीडब्ल्यूसी) अहवालानुसार देशात विविध 123 जलाशयांमध्ये उपलब्ध पाणीसाठा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 141% इतका आहे.
अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा
.............
G.Chippalkatti/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642757)
Visitor Counter : 255