राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी ईद-उल-जुहा च्या पूर्वसंध्येला देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 31 JUL 2020 9:24PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी ईद-उल-जुहा च्या पूर्वसंध्येला सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, ``ईद-उल-जुहा च्या निमित्ताने मी सर्व देशवासियांना, विशेषतः मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना शुभेच्छा देतो आणि अभिवादन करतो.

ईद-उल-जुहा हा सण म्हणजे आपसातला बंधुभाव आणि त्यागाची भावना यांचे प्रतीक आहे, तसेच लोकांच्या कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा देतो.

चला, आपण सगळे कोविड – 19 या साथीच्या रोगाशी लढण्यासाठी सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याच्या शपथेचा पुनरुच्चार करूया. या उत्सवाच्या प्रसंगी आपण आपला आनंद इतरांशी वाटून घेऊ आणि परस्पर सौहार्द वाढवूया.``

.....

G.Chippalkatti/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642743) Visitor Counter : 123