रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

बिहारमधल्या महात्मा गांधी सेतूच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या अपस्ट्रीम कॅरेजवेचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले लोकार्पण


गंगा नदीवर पाटणा इथे  3000 कोटी रुपये खर्चाच्या 5 किमी लांबीच्या नव्या पुलाची घोषणा

बिहार मध्ये 30,000  कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याची जनरल (निवृत्त) व्ही के सिंग यांची माहिती

Posted On: 31 JUL 2020 9:18PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आज बिहारमधल्या महात्मा गांधी सेतूच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या अपस्ट्रीम कॅरेजवेचे व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे उद्घाटन केले. बिहारचे मुख्य मंत्री नितीश कुमार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, रविशंकर प्रसाद, केंद्रीय राज्य मंत्री जनरल ( निवृत्त ) व्ही के सिंग, अश्विनी चौबे, नित्यानंद राय यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग -19 वर पाटणा आणि हाजीपुर दरम्यान हा 5.5किमीचा चार पदरी पूल1742 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला.  आहे. 2017 मध्ये या पुलाचे बांधकाम सुरु झाले होते. दोन भागात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते.  हा अपस्ट्रीम मार्ग जुलै महिन्यात पूर्ण झाला. त्यानंतर आता डाऊन स्ट्रीम मार्गाचे काम हाती घेण्यात येईल आणि 2021 पर्यंत हे काम पूर्णत्वाला नेण्यात येईल. 6600 मेट्रिक पोलाद असलेले   नवे पोलादी बांधकाम, जुन्या नादुरुस्त कॉन्क्रिटची जागा घेणार आहे. असे नव्या प्रकारचे काम भारतात प्रथमच करण्यात येत आहे. उत्तर बाजूला   हाजीपुर,

हाजीपुर, छाप्रा, मुझ्झप्परपूर, समस्तीपुर, दरभंगा, मधुबनी, सीतामढी, सिवान या जिल्ह्यांना आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व  भागांना तर दक्षिण बाजूला पाटणा, नालंदा, गया, औरंगाबाद जिल्ह्यांना आणि झारखंडला याचा लाभ होणार आहे. 

अस्तिवात असलेले बांधकाम सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला हा पहिला पूल  असल्याचे गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले. हा अभियांत्रिकी क्षेत्रातला चमत्कार असल्याचे  सांगून सिव्हील इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हे उदाहरण उत्तम असल्याचे ते म्हणाले. गंगा नदीवर पाटणा इथे 5 किमी लांबीच्या  नव्या पुलाची त्यांनी घोषणा केली असून त्याखाली  जहाजांची ये-जा सुलभ होण्यासाठीची सोय राहणार आहे. यासाठी पुढच्या महिन्यात निविदा काढण्यात येणार असून लवकरच काम सुरु होईल असे ते म्हणाले. या पुलासाठी सुमारे 3,000कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय जलमार्ग जाळ्याबाबत बोलताना गंगा नदीत प्रयागराज आणि पश्चिम बंगाल मधल्या हल्दिया दरम्यान पाण्याची  तीन मीटर खोली सुनिश्चित करण्यात आली आहे. वाराणसी आणि प्रयागराज दरम्यान ड्रेजिंग पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात  यमुना नदीत दिल्ली आणि प्रयागराज दरम्यानच्या  एक मीटर ड्राफ्टसाठी काम करण्यात येत आहे. या टप्य्यासाठी 12,000 कोटी रुपयांचा  डीपीआर जागतिक बँकेकडे देण्यात आल्यची माहिती त्यांनी दिली. दिल्ली ते हल्दिया दरम्यान जल प्रवासाचे आपले स्वप्न लवकरच साकार होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

नदीमार्गे वाहतूक  किफायतशीर आणि  पर्यावरण स्नेही असल्याने बिहार मधल्या राजकीय नेतृत्वाने याचा मोठ्या प्रमाणात स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले. नदी मार्गे वाहतुकीचा वाणिज्य बाबींसाठी उपयोग करत सरकार आणि व्यवसाय जगत लॉजिस्टिक खर्च कमी करू शकते.  यामुळे अर्थव्यवस्थेलाही मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

बिहारमध्ये 10,000 कोटी रुपयांची पुलाची कामे हाती घेण्यात येत असल्याने राज्यातले रोजगाराचे चित्र बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले.गरिबी, बेरोजगारी आणि उपासमार संपुष्टात आणण्यासाठी  औद्योगिकीकरण  हवे असे मत त्यांनी मांडले. गरीब आणि बेरोजगारांना आर्थिक घडामोडींच्या मुख्य प्रवाहात आणल्यानंतरच खऱ्या अर्थाने विकास साध्य होईल असे ते म्हणाले. महामार्गालगत एमएसएमई क्लस्टर विकसित करून कारागीर आणि हस्तकला, हातमाग कारागीरांची  प्रचंड क्षमता उपयोगात आणण्याचे त्यांनी सुचवले. आनंदी आणि समृद्ध जनता हा कोणत्याही विकसित राष्ट्राचा कणा  असल्याचे ते म्हणाले. 

राज्यासाठी गेल्या वर्षी मोठे विकास पॅकेज पंतप्रधानानी  जाहीर केल्याचे स्वागत करत त्यांनी या प्रयत्नाचेही स्वागत केले.राज्यात महामार्ग आणि पुलांचे काम जलदगतीने पूर्ण केल्या बद्दल त्यांनी नितीन गडकरी यांची प्रशंसा केली.सध्याच्या विक्रमशीला पुलाला समांतर 2 किंवा 4 पदरी पूल बांधण्याबाबत विचार करण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. बक्सर आणि वाराणसी दरम्यान थेट मार्गाची गरज त्यांनी सूचित केली. वाहतुकीचा ओघ सुरळीत राहावा यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीत एकसमानता असावी  याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

G.Chippalkatti/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1642731)