कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

जम्मू काश्मीरमधे प्रधान मंत्री ग्राम सडक योजना - II अंतर्गत विविध विकास कामांची डॉ जितेंद्र सिंह यांच्याकडून ऑनलाईन पायाभरणी


जम्मू काश्मीरच्या विविध भागात पीएमजीएसवाय- II अंतर्गत सुमारे 175 कोटी रुपयांचे 28 रस्ते बांधण्यात येणार

प्रविष्टि तिथि: 31 JUL 2020 7:02PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी जम्मू काश्मीर मधे पीएमजीएसवाय- II अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या विविध विकास बांधकामांची आज ऑनलाईन पायाभरणी केली. जम्मू काश्मीरच्या विविध भागात प्रधान मंत्री ग्राम सडक योजना - II अंतर्गत सुमारे 175 कोटी रुपये खर्चाचे 28 रस्ते बांधण्यात येणारअसून यामध्ये चानुंटा खास ते भूक्त्रीयान खास, फलाटा ते बिखन गाला,अर्नास ते थाक्राकोटे, रामनगर ते डूडू, पौनी ते कुंड यासह इतर काही रस्त्यांचा समावेश आहे.

पीएमजीएसवाय- II अंतर्गत कामगिरीत हिमाचल प्रदेश नंतर जम्मू काश्मीरने बाजी मारत दुसरे स्थान मिळवल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी या प्रकल्पांचे ई उद्घाटन करताना सांगितले. विकसनशील राष्ट्रांसाठी रस्ते म्हणजे जीवनवाहिनी असल्याचे सांगून यामुळे शिक्षण, आरोग्य, कृषी माल विपणन, यासारख्या क्षेत्रांना लाभ होतो आणि इतरही अनेक सामाजिक लाभ यामुळे येतात असे त्यांनी सांगितले.

पूर्ण झालेले विकास प्रकल्प, औपचारिक उद्घाटनाची वाट न पाहता देशातल्या जनतेला समर्पित करावे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिल्याचा पुनरुच्चार डॉ जितेंद्र सिंह यांनी केला. लोकांच्या आवश्यकता पूर्ण करण्याला सरकारचे प्राधान्य असून विविध विकास प्रकल्पांचे औपचारिक उद्घाटन न झाल्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागू नये यावर सरकारचा कटाक्ष असल्याचे ते म्हणाले.

सर्वच स्तरावर पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यात येईल यावर त्यांनी भर दिला. गेल्या सहा वर्षात सुरु केलेले प्रकल्प, कोविड-19 सारख्या विविध अडचणीतूनही मार्ग काढत कालबद्ध पूर्ण करण्याची पद्धत सरकारची कटीबद्धता प्रतीत करणारे असल्याचे ते म्हणाले.

जम्मू काश्मीर आणि लडाख यांच्या केंद्र शासित प्रदेश म्हणून निर्मितीच्या वर्धापन दिनाच्या पूर्व संध्येला डॉ सिंग म्हणाले की गेल्या वर्षी विविध आघाड्यांवर अनेक घडामोडी झाल्या, उदा. प्रशासकीय आणि शिक्षण, उर्जा, रस्ते यासारख्या क्षेत्रातला विकास.

जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारशी समन्वयाने काम करत असल्याचे प्रशंसोद्गार काढत या प्रशासनाला काही अडचणी असल्यास त्या दूर करण्यासाठी केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

जम्मू काश्मीरचे प्रधान सचिव, जम्मू, दोडा, कथुआ, किश्तवाड, उधमपूर, रीआसी आणि रामबन जिल्हा प्रशासनाचे अधिकारी या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाले.

 

M.Chopade/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1642639) आगंतुक पटल : 201
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Tamil , Telugu