ऊर्जा मंत्रालय

केंद्रीय ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते 800 मेगावॅट क्षमतेचे तीन पवनऊर्जा प्रकल्प राष्ट्राला समर्पित


या प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे 600,000 घरांना प्रकाश मिळणार आणि कार्बन उत्सर्जनात प्रतिवर्ष 2 दशलक्ष टनाची कपात होणार

Posted On: 29 JUL 2020 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2020

केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) राज कुमार सिंग यांच्या हस्ते सेम्बकॉर्पच्या (Sembcorp) एसईसीआय 1, 2 आणि 3 हे अत्याधुनिक प्रकल्प राष्ट्रास समर्पित करण्यात आले. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याचे सहसचिव भानू प्रताप यादव, यांच्यासह सेम्बकॉर्पचे समुह अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वोन्ग किम यीन सिंगापूरहून आणि सेम्बकॉर्पचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक विपुल टुली या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

सेम्बकॉर्प एनर्जी इंडिया लिमिटेड (एसईआयएल), ही सेम्बकॉर्प उद्योगसंचलित उपकंपनी आहे. कंपनीने आज 800 मेगावॅट क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्याचे जाहीर केल्याचे यामुळे भारताची नवीकरणीय ऊर्जा क्षमता 1730 मेगावॅटपर्यंत पोहचली आहे. 300 मेगावॅट क्षमतेचे SECI 3 पवनऊर्जा प्रकल्प पूर्ण करणारी सेम्बकॉर्प ही भारतीय सौर ऊर्जा महामंडळाने घेतलेल्या लिलावप्रक्रियेतील पहिली स्वतंत्र ऊर्जा कंपनी ठरली आहे. एकत्रितपणे, यामुळे 600,000 घरांना प्रकाश मिळणार आहे आणि कार्बन उत्सर्जनात प्रतिवर्ष 2 दशलक्ष टनांची कपात होणार आहे. एसईसीआय लिलावप्रक्रियेतील ही सर्वात मोठी कार्यक्षम पवनऊर्जा आहे.

सिंग यांनी नवीकरणीय उर्जा क्षेत्रातील कामाच्या वचनबद्धतेबद्दल  एसईएल आणि सिंगापूर सरकारचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ऊर्जा क्षेत्रात पारदर्शकता,प्रामाणिकपणा आणि सर्वांना समान संधी देऊन ऊर्जा परिवर्तन घडवून आणण्यासाठी दृढनिश्चयी आहोत. ते पुढे म्हणाले, 2020 पर्यंत नवीकरणीय ऊर्जेचे 175 गिगावॅटचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि पंतप्रधानांचे 2030 पर्यंत 450 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.  

सेम्बकॉर्पचे समुह अध्यक्ष आणि सीईओ, वोन्ग किम यीन याप्रसंगी म्हणाले, सेम्बकॉर्पच्या ऊर्जा व्यवहारातील भारत प्रमुख बाजारपेठ आहे. आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाठी भारत सरकारचे आभारी आहोत आणि आम्ही यापुढेही भारतातील नागरीकरण, विद्युतीकरण आणि डिकार्बनायजेशनसाठी पाठिंबा देऊ.

 

 

G.Chippalkatti/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1642174) Visitor Counter : 146