आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

सबस्टन्स यूज डिसऑर्डर अंमली पदार्थाच्या वापरामुळे होणारे विकार ( एसयूडी) आणि वर्तणूक व्यसनांसाठी प्रमाणित उपचार मार्गदर्शक तत्त्वासंबंधी पुस्तकाचे डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते प्रकाशन


“मार्गदर्शक तत्त्वे अंमली पदार्थाच्या वापरामुळे होणाऱ्या विकारांवरील उपचारामधील अंतर कमी करण्यास आणि देशाला निरोगी, आनंदीआणि समृद्ध होण्याच्या दिशेने प्रगती करायला मदत करतील”

Posted On: 29 JUL 2020 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई, 29 जुलै 2020

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे  विकार आणि वर्तणूक  व्यसनांच्या व्यवस्थापनासाठी प्रमाणित उपचार मार्गदर्शक तत्वे या ई-पुस्तकाचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रकाशन  करण्यात आले. देशातील अंमली पदार्थाच्या गैरवर्तन आणि वर्तणूक  व्यसनांच्या समस्येचा सामना करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. यावेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  अश्विनी कुमार चौबे उपस्थित होते.

यावेळी डॉ हर्ष वर्धन यांनी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकार, कर्करोग, रस्ते अपघात तसेच मानसिक आरोग्यासारख्या असंसर्गजन्य आजारांशी अंमली पदार्थांच्या वापराच्या हानिकारक संबंधांबाबत सर्वांना माहिती आहेच.   जुगार, खरेदी, सायबर-रिलेशनल आणि ऑनलाइन संबंधात अति सहभाग आणि पोर्नोग्राफी आणि ऑनलाइन गेम्सचे व्यसन यासारख्या वर्तनात्मक व्यसनांसह सायबर-लैंगिक व्यसनांचा समावेश प्रमाणित उपचार मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केला आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

ते म्हणाले की डीडीएपीने विकसित केलेल्या 'प्रमाणित उपचार मार्गदर्शक तत्वांमध्ये (एसटीजी) मध्ये प्रत्येक सामान्य दवाखाना त्यांचे अनुकरण करू शकतील अशा विविध अंमली पदार्थामुळे होणारे आजार  किंवा व्यसनाच्या व्यवस्थापनाविषयी ठाम  शिफारस केली आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की या मार्गदर्शक तत्त्वांमुळे अंमली पदार्थाच्या वापरामुळे उद्‌भवणाऱ्या विकारांवरील उपचारादरम्यानचे  अंतर कमी होण्यास आणि देशाला निरोगी, आनंदी आणि समृद्ध होण्याच्या दिशेने प्रगती करण्यात मदत होईल.

कोविड -19 च्या काळात व्यसनांच्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या महत्वाबाबत  डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले की वर्ल्ड ड्रग रिपोर्ट 2020  मध्ये सूचना केली आहे की आर्थिक संकटांमुळे यापूर्वी उद्‌भवलेल्या दुष्परिणामांप्रमाणे कोविड -19 चेही इतर  दुष्परिणाम होऊ शकतात  - स्वस्त दरात कृत्रिम अंमली पदार्थ शोधणारे वापरकर्ते ; ज्यामुळे गरीब व वंचित लोक अमली पदार्थांच्या वापराकडे वळत आहेत आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. धूम्रपान केल्यामुळे कोविड -19 चा धोका वाढतो तसेच विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये त्याचा विपरीत परिणाम होऊ  शकतो याबाबत देखील त्यांनी सविस्तर भाष्य केले. दारूची नशा देखील जोखीम वाढवू शकते आणि प्रतिकारशक्ती कमी होण्याबरोबरच  इतर परिणाम धोका वाढवू शकतात. असेच दुष्परिणाम इतर औषधांमुळेदेखील उद्‌भवू शकतात असे ते म्हणाले.

जनतेत कोविडचा प्रतिकार करण्यासाठी  योग्य वर्तणूक निर्माण करण्याच्या सरकारच्या मोहिमेच्या यशाने प्रभावित झालो असून प्रत्येक मुलाला तज्ञांच्या शिफारशीमुळे  निकषांची जाणीव आहे असे सांगताना  त्यांनी या समस्येकडे  लक्ष वेधण्यासाठी लोक चळवळीची गरज असल्याचे सांगितले. हा सामाजिक प्रश्न  केवळ वैद्यकीय समुदायापुरता  मर्यादित नाही. सार्वजनिक जीवनातल्या व्यक्तींनी आणि धार्मिक संघटनांनाही जनजागृती करण्यात सहभागी करून घ्यावे . 

पंतप्रधानांचे नवीन भारताचे स्वप्न साकारण्यासाठी व्यसनाधीनतेला सामोरे जाण्यासाठी समाज आणि वैद्यकीय समुदाय यांच्यात जागरूकता आणि सहकार्य आवश्यक आहे. 

राष्ट्रीय मानसिक आरोग्य अहवाल 1996 मध्ये मुख्यतः तंबाखू, अल्कोहोल, भांग आणि  अफीम संबंधित  व्यसनाशी संबंधित पदार्थांच्या वापराच्या विकारांवरील उपचारांमधील अंतर 76-85% असल्याचे निदर्शनाला आले आहे. तंबाखू नियंत्रण आणि औषध अवलंबन व उपचार कार्यक्रम (टीसी आणि डीडीएपी) च्या तज्ञ गटाद्वारे प्रमाणित उपचार मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यात आली आहेत.  या गटात राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि  न्यूरो-सायन्स संस्था (निम्हंस), बेंगलुरू, एम्स, नवी दिल्ली, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था (पीजीआईएमईआर), चंदीगड , वर्धमान महावीर वैद्यकीय महाविद्यालय  (व्हीएमएमसी) आणि सफदरजंग हॉस्पिटल, अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय विज्ञान संस्था (एबीव्हीआयएमएस) आणि आरएमएल रुग्णालय येथील अंमली पदार्थाचा वापर प्रतिबंध आणि उपचार क्षेत्रात कार्यरत मानसोपचारतज्ज्ञांचा समावेश आहे. ही  मार्गदर्शक तत्त्वे संसाधनांच्या डिजिटल लायब्ररीद्वारे देखील उपलब्ध आहेत: http://books.vknnimhans.in/books/jllx/#p=1.

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642155) Visitor Counter : 315