मंत्रिमंडळ

भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान पारंपरिक औषधी आणि होमिओपथी क्षेत्रातील सहकार्यासंबंधीच्या परस्पर सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

Posted On: 29 JUL 2020 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान पारंपरिक औषधी आणि होमिओपथी क्षेत्रातील परस्पर सामंजस्य कराराला पूर्वलक्ष्यी प्रभावाने मंजूरी देण्यात आली.  3 नोव्हेंबर 2018 रोजी  या संदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. 

तपशील

या माध्यमातून पारंपारिक औषधी आणि होमिओपॅथीच्या प्रसारासाठी दोन्ही देशांमधील सहकार्यासाठी एक आराखडा तयार करण्यात येईल ज्याचा दोन्ही देशांतील पारंपारिक वैद्यकीय क्षेत्राला लाभ होईल.

उद्दिष्ट

समानता आणि परस्पर लाभाच्या जोरावर दोन्ही देशांमधील पारंपरिक औषधी क्षेत्रातील सहकार्य बळकट करणे, त्याचे संवर्धन करणे आणि विकास करणे हे या सामंजस्य कराराचे मुख्य उद्दीष्ट आहे. पुढील क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यावर करारामध्ये भर देण्यात आला आहे:

  1. कराराच्या कक्षेत अध्यापन, प्रॅक्टीस, औषधे आणि औषधांविना उपचारपद्धती यांचा समावेश आहे.
  2. सामंजस्य कराराच्या चौकटीत नमूद केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रात्यक्षिक आणि संदर्भ देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व औषधी साहित्य आणि दस्तावेजांचा पुरवठा
  3. प्रॅक्टिशनर, पॅरामेडिक्स, शास्त्रज्ञ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण यासाठी तज्ज्ञांची देवाणघेवाण;
  4. संशोधन संस्था, शैक्षणिक व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी इच्छुक वैज्ञानिक, चिकित्सक, पॅरामेडिक्स आणि विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था;
  5. फार्माकोपिया आणि फॉर्म्युलायर्ससाठी परस्पर मान्यता;
  6. दोन्ही देशांनी अधिकृतरित्या निश्चित केलेल्या औषध पद्धतींना परस्पर मान्यता;
  7. दोन्ही देशांदरम्यानच्या केंद्रीय/राज्य विद्यापीठांच्या शैक्षणिक पात्रतांना परस्पर मान्यता;
  8. मान्यताप्राप्त संस्थांमधील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची तरतूद;
  9. दोन्ही देशांच्या कायद्यांनूसार पात्र चिकित्सकांना  पारंपरिक औषधांसाठी परस्पर आधारावर मान्यता;
  10. दोन्ही देशांतील कायद्यांनूसार पात्र चिकित्सकांना प्रॅक्टीस करण्यासाठी परस्पर आधारावर मान्यता;
  11. दोन्ही देशांनी मान्य केलेले इतर कोणेतही क्षेत्र/सहकार्याचे ठरवलेले स्वरुप याला मान्यता.

G.Chippalkatti/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1642127) Visitor Counter : 255