कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना नवी दिल्ली येथे भारतीय योग संस्थानतर्फे पीएम केअर्स निधीसाठी डिमांड ड्राफ्ट आणि धनादेश सुपूर्द
Posted On:
28 JUL 2020 9:56PM by PIB Mumbai
कोविड रोगाने योगाबद्दल जगभरात रुची निर्माण केल्याच्या मुद्द्यावर भर देताना केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर संयुक्त राष्ट्राने “आंतरराष्ट्रीय योग दिन” घोषित केल्यानंतर योगाने जगभरात लोकप्रियता मिळाली असून आजपर्यंत योगा न करणार्या व्यक्तींनीसुध्दा साथीच्या आजाराच्या काळात आणि लॉकडाऊन दरम्यान योगाच्या लाभांमध्ये गंभीरतापूर्वक रस घ्यायला सुरुवात केली.
भारतीय योग संस्थानने पीएम केअर्स निधीसाठी दिलेले डिमांड ड्राफ्ट आणि धनादेश स्वीकारताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान मोदींच्या शब्दांची आठवण करून दिली - कोरोना आरोग्य संकटाच्या काळात हॉलिवूडपासून हरिद्वारपर्यंत सर्वानी योगाची गंभीर दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय योग संस्थानशी असलेल्या दीर्घकालीन संबंधांचे स्मरण करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, टीव्ही किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम उपलब्ध नव्हते तेव्हापासून संस्थानच्या स्वयंसेवकांनी योग शिक्षण आणि प्रसार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.
मात्र , आज योग लोकांच्या जीवनात वेगाने आपले स्थान निर्माण करत आहे आणि गेले बारा आठवडे किंवा त्याहून अधिक काळात आरोग्याप्रती जागरूकता अचानक अनेक पटींनी वाढली आहे.
विशेषत: टाळेबंदीच्या कालावधीत अनेकांनी केवळ प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नाही तर एकाकीपणा, चिंता किंवा संभाव्य नैराश्यातून मुक्त होण्यासाठी योगासनांचा अवलंब केला असे निरीक्षण डॉ. जितेंद्र सिंह यांनी नोंदवले.
कोरोना महामारी येण्यापूर्वीच जगभरातील लोकांना मधुमेह मेलिटस सारख्या असंसर्गजन्य रोगासह विविध आरोग्यविषयक परिस्थितींमध्ये योगाचे फायदे समजले होते, जेथे योगाभ्यास आणि त्याचे फायदे अगदी पाश्चात्य चिकित्सकांनी देखील रक्तातील साखरेच्या पातळीचे व्यवस्थापन आणि नियंत्रण यामध्ये एक सहायक थेरपी म्हणून स्वीकारले आहेत.. हृदयरोग आणि उच्चरक्तदाब या आधुनिक आजारांच्या उपचारात योगाच्या वैज्ञानिक अनुकूलतेमुळे रोगांच्या व्यवस्थापनात एकात्मिक किंवा समग्र दृष्टिकोनाला विश्वास दिला आहे.
लॉकडाऊन कालावधी दरम्यान, अनेक ऑनलाईन योग कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते आणि लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे योगाचा अभ्यास ऑनलाईन किंवा डिजिटल सहाय्याने करण्याचे अनेक नवीन पर्याय सुरू होण्यास प्रेरणा मिळाली. असे डॉ जितेंद्रसिंग यांनी नमूद केले
ज्यांना लॉकडाऊन कालावधीत योगाची सवय झाली आहे, ते कोरोना विषाणू संपल्यानंतरही,बहुधा त्यांचा अभ्यास असाच चालूच ठेवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
भारतीय योग संस्थानच्या प्रतिनिधी मंडळामध्ये सरचिटणीस देस राज, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शरतचंद्र अग्रवाल, दिल्लीचे अध्यक्ष ललितकुमार गुप्ता आणि इतरांचा समावेश होता.
****
B.Gokhale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1641947)
Visitor Counter : 205