ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

रामविलास पासवान यांच्या हस्ते बीआयएस मोबाईल अ‍ॅप ‘बीआयएस केअर’ आणि ई-बीआयएसच्या प्रमाणीकरण, अनुरुप मूल्यांकन आणि प्रशिक्षण पोर्टलचा शुभांरभ  

Posted On: 27 JUL 2020 10:30PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे मंत्री रामविलास पासवान यांच्या हस्ते आज भारतीय मानक ब्युरोच्या मोबाईल अ‍ॅप बीआयएस केअर’ आणि तीन पोर्टल- प्रमाणीकरण, अनुरुप मुल्यांकन आणि ई-बीआयएसचे प्रशिक्षण पोर्टलचा www.manakonline या संकेतस्थळावर ग्राहकांसाठी शुभारंभ करण्यात आला. बीआयएस-केअर मोबाईल अ‍ॅप सर्व अँड्रॉईड फोनच्या माध्यमातून वापरता येईल. हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असून ते गुगल प्ले स्टोअरवरुन मोफत डाऊनलोड करता येईल. ग्राहक या अ‍ॅपचा वापर करुन आयएसआय-मार्क व हॉलमार्क उत्पादनांच्या सत्यतेची पडताळणी करु शकतात आणि तक्रारी नोंदवू शकतात. ग्राहकांचे हित जपण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलले असल्याची मंत्री म्हणाले.

याप्रसंगी रामविलास पासवान यांनी एक राष्ट्र, एक मानक योजनेविषयी बोलताना सांगितले की, भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) देशातील इतर मानक विकास संघटनांच्या मान्यतांसाठी मानक सूत्रीकरण सुसंवाद साधावा या हेतुने एक योजना तयार केली आहे.

आत्मनिर्भर भारत अभियानाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आणि ग्राहक हित संरक्षणासाठी, बीआयएसला आपली निर्यात आणि स्वस्त आणि कमी दर्जाच्या उत्पादनांची आयात यांच्या मानकांविषयी प्रयत्न वाढवावे लागणार आहेत, असे रामविलास पासवान म्हणाले.

त्यांनी सांगितले की, ग्राहक व्यवहार विभागाने मानक राष्ट्रीय कृती आराखड्यास मान्यता दिली असून मानकांच्या विकासासाठी अर्थव्यवस्थेतील महत्त्वाची क्षेत्रं निश्चित केली आहेत.

पासवान यांनी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मदत करण्याच्या गरजेवरही पुनरुच्चार केला आणि कोविड-19 चा सामना करण्यासाठी एमएसएमईना देण्यात आलेल्या सवलतींविषयी माहिती दिली. ते म्हणाले, त्यांच्यासाठी किमान चिन्हांकन शुल्कात केवळ 40% नी कपात केली नाही तर त्यांना शुल्क दोन टप्प्यात जमा करण्याचा पर्यायही दिला आहे. परवान्यांचे नुतनीकरण करण्यासाठीची मुदत 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

कोविड-19 संक्रमण परिस्थितीत, बीआयएसने प्रावरणे आणि व्हेंटीलेटर्स यांच्यासाठी कोविड प्रमाणीकरण विकसित करुन एन-95 मास्क, वैद्कीय मास्क आणि डोळ्यांच्या सुरक्षेसाठी लागणाऱ्या उपकरणांच्या परवान्यांबाबत निकष जाहीर केले. परिणामी आयएसआय चिन्हांकीत पीपीई उत्पादनात वाढ झाली. तसेच आयएसआय चिन्हांकीत एन-95 मास्कची दैनंदिन उत्पादनक्षमता दोन लाखांहून कमी होती ती चार लाखांहून अधिक झाली.  

***

M.Chopade/S.Thakur/P.Kor

 

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1641737) Visitor Counter : 246