श्रम आणि रोजगार मंत्रालय
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (EPFO) एप्रिल ते जून 2020 दरम्यान 73.58 लाख खाते धारकांचे KYC पूर्ण केले
प्रविष्टि तिथि:
27 JUL 2020 8:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2020
ऑनलाइन सेवा सर्व खातेधारकांपर्यंत पोचण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने 75.58 लाख खाते धारकांची माहिती एप्रिल ते जून 2020 दरम्यान केवायसी च्या अंतर्गत अद्ययावत केली आहे. याअंतर्गत 52.15 लाख खाते धारकांची आधार जोडणी, 17.48 लाख खातेदारांची मोबाईल जोडणी (युएएन ॲक्टिवेशन) आणि 17.87 लाख वर्गणीदार यांच्या बँक खाते जोडणी चा समावेश आहे. केवायसी ही प्रक्रिया एकदाच करावी लागते, त्यामुळे सर्व खाते धारकांच्या खाते क्रमांकाला केवायसी माहिती शी जोडले जाते. यामुळे खातेदारांची ओळख पटवणे सुलभ होते.
इतक्या मोठ्या प्रमाणात केवायसी जोडणी सुलभ होण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने लॉक डाऊन सुरू असताना देखील खाते धारकांची वैयक्तिक माहिती अद्ययावत करून घेण्याची मोहीम राबवली होती. यात 9.37 लाख जणांच्या नावातील चुका, 4.18 लाख जणांच्या जन्मतारखेतील चुका, तर 7.16 लाख जणांच्या आधार क्रमांकातल्या चुका एप्रिल ते जून 2020 दरम्यान दुरुस्त करण्यात आल्या.
कोविड महामारी दरम्यान शारीरिक अंतर राखण्यासाठी संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांना घरी राहून काम करण्यास प्रवृत्त केले व तरीही सर्व खात्यांच्या केवायसी ला दिलेल्या वेळेत अद्ययावत केले. सर्व कर्मचाऱ्यांना दर दिवशी करण्याचे काम आखून दिले गेले व त्यानुसार दिलेले काम त्या दिवशीच पूर्ण करण्याचे धोरण राबवले.
खाते धारकांच्या आधार जोडणी साठी कंपनीच्या मालकावर अवलंबून न राहता खाते धारकाच्या आधार कार्डावरील जन्मतारीख प्रमाणभूत मानल्यामुळे ही प्रक्रिया जलद झाली.
केवायसी अद्ययावत केल्यामुळे खातेधारकांना सर्व ऑनलाईन सुविधांचा लाभ घेता येणार आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत कोविड काळात खास परवानगी दिल्या प्रमाणे अंशतः पैसे काढणे, तसेच पूर्ण पैसे काढणे देखील ऑनलाईन करता येईल. नोकरी बदलल्यास आपले ईपीएफ खाते दुसऱ्या मालकाकडे हस्तांतरित करणेही ऑनलाईन शक्य होईल. या खाते धारकाचे केवायसी अद्ययावत झाले आहे तो 'उमंग' ॲप अथवा कोणत्याही डेस्कटॉप संगणकावरून सर्व ऑनलाईन सुविधांचा लाभ घेऊ शकतो.
* * *
M.Iyengar/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1641629)
आगंतुक पटल : 282