उपराष्ट्रपती कार्यालय

आपल्या मातृभाषेत प्राविण्य मिळवावे : उपराष्ट्रपती

Posted On: 24 JUL 2020 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2020

 

आपल्या मातृभाषेत प्राविण्य मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. मातृभाषा शिकणे आणि त्यात प्राविण्य मिळवणे महत्वाचे आहेच, त्यासोबतच, इतर प्रदेशातील सांकृतिक विविधता आणि मूल्यव्यवस्था समजून घेण्यासाठी इतर भाषाही शिकल्या पाहिजेत, असेही नायडू म्हणाले. अमेरिकेतील सैन फ्रान्सिस्को येथे आयोजित “जागतिक तेलुगु सांस्कृतिक महोत्सवात’ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. इतर भाषा शिकल्यामुळे आपल्याला विविध संधी तर उपलब्ध होतातच, त्याशिवाय एकूण मानवजातीविषयीचा आपला दृष्टीकोन अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक होतो, असेही उपराष्ट्रपती म्हणाले.

भाषा केवळ आपल्या भावना व्यक्त करण्याचे किंवा संवादाचे माध्यम नसून संस्कृतीमध्ये त्यापेक्षा तिचे अधिक व्यापक स्थान आहे, असे नायडू म्हणाले. भाषा ही कोणत्याही संस्कृतीचे प्रकटीकरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली मूल्यपरंपरा सांगणारा तो एक दुवा आहे. विविध संस्कृती व्यक्त करणारे ते माध्यम आहे. असे उपराष्ट्रपती म्हणाले.

मदर म्हणजे आई, मदरलैंड म्हणजे मातृभूमी,मदर टंग म्हणजे मातृभाषा आणि मेंटोर म्हणजे गुरु या चार ‘एम’ विषयी सर्वांनी कृतज्ञ राहायला हवे, असे नायडू यांनी सांगितले.

“धर्म हा प्रत्येकाच्या वैयक्तिक उन्नतीचा मार्ग आहे. संस्कृती ही आपले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठीचे प्रत्यक्ष साधन आहे. भाषा ही संस्कृतीचा अविभाज्य घटक असून, एखाद्याचे आयुष्य घडवण्यात भाषा अत्यंत महत्वाची असते. त्यामुळेच, साधू संत आणि विचारवंतानी कायम योग्य शब्द आणि भाषेची निवड करावी”, असा उपदेश केला आहे, असे नायडू म्हणाले.


* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1641100) Visitor Counter : 170