अर्थ मंत्रालय

राष्ट्रबांधणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या प्राप्तिकर विभागाचा 160 वा स्थापना दिन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळातर्फे साजरा; जनतेच्या समस्यांबाबत प्रतिसादात्मक दृष्टीकोन ठेवल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून प्राप्तिकर विभागाचे कौतुक

Posted On: 24 JUL 2020 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2020

 

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आणि त्यांच्या देशभरातील  सर्व कार्यालयांमध्ये आज 160 वा प्राप्तिकर दिवस साजरा करण्यात आला.

या दिवसानिमित्त दिलेल्या संदेशात, केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन कर-प्रशासन व्यवस्था, करदात्यांना सोयीची, पारदर्शक आणि वेगवान ठरेल यासाठी, प्राप्तिकर करत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले. गेल्या काही वर्षात, प्राप्तिकर खात्यात झालेल्या आमूलाग्र परिवर्तनाचा त्यांनी उल्लेख केला. केवळ महसूल संकलित करण्याचे साधन न राहता, हा विभाग आता नागरीकाभिमुख व्यवस्था निर्माण करता झाला आहे, असे त्या म्हणाल्या. त्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली. नव्या, सुलभ करचनेची निर्मिती, कॉर्पोरेट करात घट, देशांतर्गत उत्पादन कंपन्यांसाठी करात सवलत, अशा उपाययोजनांमुळे आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक प्रशस्त होऊ शकेल, असे सीतारामन म्हणाल्या.

कोविड-19 आजारच्या काळात,करदात्यांच्या गरजा, समस्या याबाबत प्रतिसादात्मक दृष्टीकोन ठेवल्याबद्दल त्यांनी प्राप्तिकर विभागाचे कौतुक केले. करविवरण पत्रासाठी आवश्यक अशा विविध अटींमध्ये सवलत आणि करदात्यांच्या तरलते विषयकच्या चिंतांची दाखल घेत, प्राप्तिकर विभागाने त्यावर उपाययोजना केल्या. देशाच्या प्रगतीत प्राप्तिकर विभागाची महत्वाची भूमिका तर असेलच, असे सांगत, आपण आपल्या व्यावसायिक मूल्यांना अधिकाधिक दर्जेदार करण्यासाठी काम करु असा विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला.

 

* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1641035) Visitor Counter : 216