भारतीय स्पर्धा आयोग

कृष्णापट्टणम पोर्ट कंपनी लिमिटेडच्या अधिग्रहणाला ‘सीसीआय’ची मंजुरी


अदानी पोर्टस् आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड करणार अधिग्रहण

प्रविष्टि तिथि: 23 JUL 2020 2:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जुलै 2020

भारतीय प्रतिस्पर्धा आयोग-सीसीआयने कृष्णापट्टणम पोर्ट कंपनी लिमिटेडच्या अधिग्रहणाला मान्यता दिली आहे. अदानी पोर्टस् व स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडद्वारा हे अधिग्रहण होणार आहे. प्रस्तावित अधिग्रहणामुळे अदानी पोर्टस् आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (अदानी पोर्टस्) कडून कृष्णापट्टनम पोर्ट कंपनी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय नियंत्रणासह इक्विटी शेअरहोल्डिंगचे अधिग्रहण करण्याचा मार्ग मोकळा होईल.

अदानी पोर्टस् एक ग्राहकाभिमुख एकात्मिक बंदर पायाभूत सुविधा सेवा पुरविणारी कंपनी आहे. जी सध्या गुजरात, गोवा, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व ओडिशा या सहा समुद्री राज्यांमधील दहा घरगुती बंदरांमध्ये कार्यरत आहे.

आंध्र प्रदेशातील कृष्णापट्टणम येथील केपीसीएल कंपनी खोल पाण्यातील बंदर विकासक व संचालक म्हणून कार्यरत आहे.

 

U.Ujgare/S.Pophale/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1640626) आगंतुक पटल : 214
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Tamil , Telugu , Malayalam