नौवहन मंत्रालय

व्यापारी व मासेमारी करणाऱ्या जहाजांसाठी देशाच्या दक्षिण-पश्चिम भागातील जलमार्ग यंत्रणा करण्यात आली वेगळी


हा निर्णय भारतीय जलमार्गात सुलभ वाहतूकीची खात्री देण्याची आमची बांधिलकी दर्शवितो: मनसुख मांडवीय

Posted On: 21 JUL 2020 10:04PM by PIB Mumbai

 

प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या मागणीची पूर्तता करुन, नौवहन मंत्रालयाने जलवाहतूकीची सुरक्षा व कार्यक्षमता लक्षात घेऊन, दक्षिण-पश्चिम भारतीय जलमार्गातील व्यापारी व मासेमारी करणाऱ्या जहाजांचे कार्यान्वित मार्ग वेगळे केले आहेत. नवीन मार्ग 1 ऑगस्ट 2020 पासून कार्यान्वित होतील.

भारताच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्याभोवती असलेला अरबी समुद्र हा एक व्यस्त समुद्री मार्ग असून या ठिकाणी मोठ्या संख्येने व्यापारी जहाजे ये-जा करीत असतात, तसेच मासेमारी करणारी जहाजे काम करीत असतात. यामुळे काहीवेळा तेथे अपघात घडतो; परिणामी मालमत्तेचे नुकसान आणि पर्यावरणीय प्रदूषण होते; तसेच बर्‍याच घटनांमध्ये जीवितहानी देखील होते.

हा निर्णय भारतीय भागातील जलवाहतूक सुलभ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला प्रतिबिंबित करतो. धडक होण्यापासून बचाव, समुद्रावरील जीवनाच्या सुरक्षेसह वाहतूकीचा प्रवाह सुलभ करणे, तसेच सागरी वातावरणाचे संरक्षण वाढविणे, हे देखील यामुळे सुनिश्चित होईल. नौवहन महासंचलनालयांचे हे एक अतिशय सक्रिय व सकारात्मक पाऊल आहे; जे या प्रदेशातील नौवहनाचे कार्यक्षमतेने नियमन करेल, असे केंद्रीय नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडवीय याप्रसंगी म्हणाले.

*****

B.Gokhale/S.Pophale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1640394) Visitor Counter : 240