शिक्षण मंत्रालय

आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत केंद्रीय मनुष्यबळ मंत्री मनोदर्पण या उपक्रमाचा प्रारंभ करणार, विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य आणि कल्याणासाठी देणार मानसिक आणि सामाजिक पाठबळ

Posted On: 20 JUL 2020 9:40PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 20 जुलै 2020

केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक उद्या म्हणजे 21 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या मनोदर्पण या उपक्रमाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुरुवात करणार आहेत. मनुष्यबळ राज्यमंत्री संजय धोत्रे हे देखील यावेळी उपस्थित असतील. तसेच उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे, शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव अनिता कारवाल आणि मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित असतील.

पोखरियाल यांनी व्हिडिओ ट्वीटच्या माध्यमातून म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात अध्ययनाच्या दृष्टीकोनातून शिक्षण सुरू ठेवण्यावर आणि  विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर देखील भर देण्याची गरज आहे असे पोखरियाल यांनी सांगितले. त्यामुळेच आपल्या मंत्रालयाने विद्यार्थ्यांना कोविड महामारीच्या काळात आणि त्यानंतर त्यांचे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी मानसिक आणि सामाजिक पाठबळ देणारा उपक्रम हाती घेतला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

 कोविड-19 च्या उद्रेकाच्या पश्चात भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 12-5-2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरुवात केली. मानवी भांडवल बळकट करण्याचा आणि उत्पादकता वाढवण्याचा आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रभावी सुधारणा आणि उपक्रम राबवण्याचा एक भाग म्हणून आत्मनिर्भर भारत अभियानात मनोदर्पण उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

निरोगी जीवनशैली कायम राखण्यासाठी देशभरातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि तणावमुक्त जीवन जगावे, असे आवाहन पोखरियाल यांनी केले आहे.

इथे लाइव्ह पाहा  http://webcast.gov.in/mhrd

 

M.Chopade/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1640067) Visitor Counter : 239