पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

अमेरिका-भारत धोरणात्मक ऊर्जा भागीदारीवर संयुक्त निवेदन

Posted On: 17 JUL 2020 11:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जुलै 2020

 

जागतिक महामारीमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जीवितहानीचा परिणाम ऊर्जेची मागणी, जागतिक ऊर्जा बाजारपेठ आणि शाश्वत ऊर्जा विकासावर देखील होत आहे, अमेरिका-भारत सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी याआधी कधीही इतकी महत्वपूर्ण नव्हती. आज, अमेरिकेचे ऊर्जा सचिव डॅन ब्रॉऊलेट आणि भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू व पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रगतीचा आढावा घेणे, महत्वपूर्ण कामगिरी अधोरेखित करण्यासाठी आणि सहकार्यातील नवीन क्षेत्रातील प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी अमेरिका–भारत धोरणात्मक भागीदारी (एसईपी) च्या आभासी बैठकीचे संयुक्तपणे अध्यक्षस्थान भूषविले.  

अमेरिका-भारत द्विपक्षीय संबंधांना उर्जा प्रदान करण्याचे धोरणात्मक महत्त्व ओळखून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार एप्रिल 2018 मध्ये स्थापना करण्यात आलेली, एसईपी आमच्या दीर्घकालीन उर्जा भागीदारीवर आधारित असून सरकार-ते-सरकार सहकार्य आणि उद्योगातील भागीदारीद्वारे अर्थपूर्ण भागीदारीचे टप्पे  निश्चित करते.

ऊर्जा सुरक्षा आणि उर्जा उपलब्धतेसाठी अमेरिका आणि भारत सर्वांगीण दृष्टिकोन सामायिक करित असून एसईपी सहकार्याच्या चार प्राथमिक स्तंभांवर उभय बाजूंतफेॆ आंतर-संस्था गुंतवणूकीचे आयोजन करण्यात येते: (1) विद्युत आणि उर्जा कार्यक्षमता; (2) तेल आणि वायू; (3) नवीकरणीय ऊर्जा; आणि (4) शाश्वत विकास. या स्तंभाद्वारे अमेरिका आणि भारत स्वच्छ,स्वस्त आणि विश्वासार्ह ऊर्जा उपलब्धतेसाठी पॉवर ग्रीड आणि वितरण व्यवस्था मजबुत आणि आधुनिकीकरण करण्याचे, उर्जा क्षेत्रात कार्यक्षमता, लवचिकता आणि पर्यावरणीय कामगिरीमध्ये  सुधारणा; दीर्घकालीन उर्जा विकासाद्वारे समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन; तेल आणि वायू व्यापार, आणि पायाभूत सुविधा गुंतवणूकीद्वारे ऊर्जा सुरक्षा वाढविणे; अक्षय ऊर्जेचा विकास, उपयोजन आणि एकीकरणास उन्नत करणे व नवीकरणीय उर्जा प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा विस्तार; आणि उर्जा व्यापार आणि गुंतवणूकीसाठी बाजारातील अडथळे कमी करण्याचे कार्य करीत आहेत. एसईपी आशियाई ईडीजीई उपक्रमांतर्गत यूएसजी प्रयत्नांना पाठबळ देत आहे, ज्यामुळे भारत-प्रशांत महासागर क्षेत्रात मजबूत ऊर्जा भागीदार म्हणून प्रस्थापित होत आहे.

स्मार्ट ग्रिड्स आणि उर्जा संग्रहावरील प्रगत स्वच्छ ऊर्जा-संशोधन (पीएसीई-आर) माध्यमातून इलेक्ट्रिक ग्रीडची लवचिकता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी उभय देश संयुक्त ग्रिडच्या माध्यमातून संयुक्त संशोधन आणि विकासा (आर अँड डी) चे नेतृत्व करीत आहेत. आज उभय देशांनी अतिमहत्वपूर्ण सीओ2 (एससीओ 2) विद्युत चक्र आणि वीज निर्मिती व हायड्रोजन उत्पादनासाठी प्रगत कोळसा तंत्रज्ञानावर आधारित कार्बन कॅप्चर, उपयोग आणि संग्रह (सीसीयूएस) यासह परिवर्तीत वीज निर्मितीवरील संशोधनाच्या नवीन क्षेत्रांची घोषणा केली. अमेरिकेने, अमेरिका-भारत नागरी अणुउर्जा कार्य गटामार्फत प्रगत नागरी अणुऊर्जा तंत्रज्ञानावर सुरू असलेल्या द्विपक्षीय संशोधन व विकास गुंतवणूकीबद्दल माहिती दिली.

 

मंत्रिस्तरीय निकाल

एसईपी अंतर्गत नवीन कामांसाठी उभय पक्षांनी बरीच कामगिरी आणि प्राधान्यक्रम जाहीर केले.

 

ऊर्जा सुरक्षा वाढविणे

माहिती आणि उत्तम कार्यपद्धती यांची देवाणघेवाण या सह धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याचे क्रियान्वयन व देखभाल यासाठी सहकार्य सुरू करण्यासाठी उभय पक्षांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यांनी अमेरिकेच्या धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यामध्ये भारताच्या तेल साठ्याच्या साठवणुकीच्या संभाव्यतेवर चर्चा केली जेणेकरून अमेरिकेच्या धोरणात्मक तेल भंडारात वाढ होऊ शकेल.

 

नवोन्मेषाचा उपयोग

नवीकरणीय ऊर्जा आणि जीवाश्म इंधन स्त्रोतांमधून हायड्रोजन तयार करणे, वर्धित उर्जा सुरक्षा, लवचिकता ,उपयोजित खर्च कमी करणे तसेच तंत्रज्ञानास सहाय्य करण्यासाठी उभय पक्षांनी एक सार्वजनिक-खासगी हायड्रोजन कृती दल स्थापन केला. त्यांनी २०२१ मध्ये भारतामध्ये पहिल्या सौर डेकाथलॉन ® इंडिया वरील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. प्रगत स्वच्छ तंत्रज्ञानाच्या विकास आणि तैनातीवर संयुक्त संशोधन करण्यासाठी यूएसएआयडीद्वारे समर्थित, नव्याने सुरू करण्यात आलेल्या दक्षिण आशिया ऊर्जा गटा (एसजीजी) चा एक भाग म्हणून नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत यूएस डीओई राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि भारतीय राष्ट्रीय संस्था संयुक्त उपक्रमाला सुरुवात झाली आहे.

टिकाऊ जैवइंधन उत्पादन आणि वापराविषयी विशेषतः जैव ईथेनॉल, नवीकरणीय डिझेल, इतर प्रगत जैवइंधन आणि हवाई आणि समुद्री वाहतुकीसाठी टिकाऊ जैवइंधनांमधील संभाव्य घडामोडींवरील माहिती आणि संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून संभाव्य शक्यता शोधण्याचे देखील उभय देशांनी मान्य केले. धोरणे आणि नियम आणि इतर द्विपक्षीय हिताच्या माहितीच्या देवाणघेवाणीवरही उभय पक्षांनी चर्चा केली. सहकार्याचे आणखी एक संभाव्य क्षेत्र म्हणजे खाजगी क्षेत्रातील द्विपक्षीय गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे. जैव कचऱ्याचे रुपांतर बायोगॅसमध्ये करण्याच्या आर्थिक बाबींचा देखील उभय पक्ष शोध घेतील.

 

ऊर्जा प्रणालीचे आधुनिकीकरण

भारत आपल्या महत्वाकांक्षी नवीकरणीय ऊर्जेच्या उद्दीष्टांची पूर्तता करत असताना आणि आपल्या ऊर्जा क्षेत्रात बदल घडविण्याचा प्रयत्न करत असतांनाच उभय पक्षांनी ग्रिडमध्ये नूतनीकरणयोग्य ऊर्जा आणि नवीन तंत्रज्ञानाच्या तैनाती आणि समाकलनावर; वीज वितरण क्षेत्राचे आधुनिकीकरण; नवीकरणीय ऊर्जेसाठी राज्यस्तरीय नियोजनास पाठिंबा; वितरित उर्जा तंत्रज्ञान, विद्युत वाहने, छप्परांवर सौर आणि बॅटरी संचयन उपयोजित करणे; बाजारपेठेचे पुन्हा आरेखन करणे आणि ऑफ-ग्रीड उर्जा प्रवेश वाढविण्यावर सहकार्य करण्यास मंजुरी दर्शविली आहे. खाजगी सहभागामध्ये वाढ; ग्राहकाभिमुख दृष्टीकोन  वर्धित करणे; भारतभर स्मार्ट मीटर तैनात करणे; आणि स्मार्ट ग्रिड्ससाठी “ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्स” म्हणून स्मार्ट ग्रिड नॉलेज सेंटरची स्थापना या सगळ्याच्या माध्यमातून विश्वासार्ह दर्जेदार 24 तास वीजपुरवठा मिळविण्यासाठी विविध सुधारणांच्या माध्यमातून वितरण क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी उभय पक्ष सहकार्य करणार आहेत. यूएसएआयडी आणि यू.एस. आंतरराष्ट्रीय विकास वित्त महामंडळ छप्पर सौर उपयोजित करण्यासाठी लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी नवीन 25 मिलियन डॉलर्सची पत हमी स्थापित करण्याची संकल्पना विकसित करीत आहे.

नवीकरणीय उर्जा उपलब्धता आणि परिचालन खर्च आणि अपयशाची जोखीम कमी करण्यासाठी बदलत्या वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कोळसा प्रकल्पातील लवचिक क्रियान्वयन वाढविण्यासाठी काम चालू आहे. 21 व्या शतकातील कोळसा उर्जा प्रणाली विकसित करण्यासाठी यूएसडीओईच्या पहिल्या कोळसा(लवचिक, नाविन्यपूर्ण, लहान, परिवर्तनकारी) उपक्रमावर लक्ष केंद्रित करून कार्बन अपहार, उपयोग आणि संचय (सीसीयूएस) द्वारे कमी-शून्य उत्सर्जनासह प्रगत उच्च-कार्यक्षमता असलेल्या कोळसा तंत्रज्ञानावर सहयोग करण्यास उभय पक्षांनी सहमती दर्शविली आहे.

तांत्रिक सहकार्याच्या नवीन आर्थिक   क्षेत्रांमध्ये नवीकरणीय ऊर्जेचा वापर, नवीकरणीय उर्जेसाठी नवीन व्यवसाय मॉडेल आणि निर्णय घेण्याच्या साधनांचा विकास; कौशल्य उभारणी आणि प्रशिक्षण कार्यक्रम; आणि नवीकरणीय ऊर्जा प्रणालीची सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी उदयोन्मुख डिजिटल तंत्रज्ञान आणि प्रगत माहिती तंत्रज्ञान  साधनांचा अवलंब करणे समाविष्ट आहे.

 

ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन वर्धित करणे

अमेरिका आणि भारत भविष्यातील उत्पादन, स्मार्ट मीटर आणि मागणी-आधारित काम, तसेच कोड-मेकिंग क्षमता, रचना आणि क्रियान्वयन तसेच कार्यक्षमता सुधारण्यासाठी, ऊर्जा संवर्धनास चालना देणे, कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी तसेच घरांच्या आत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेगवान कृती योजनेवर कार्य करीत आहेत. उभय पक्ष वर्तनिय उर्जा कार्यकुशलता कार्यक्रमाच्या विकासासाठी आणि वितरित ऊर्जा संसाधनांच्या योजनेसाठी तांत्रिक सहाय्य करण्याच्या दिशेने काम करत आहेत. उभय पक्ष औद्योगिक क्षेत्रात उर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठीही कार्यरत आहेत आणि आयएसओ 50001 नुसार एक व्यापक ऊर्जा व्यवस्थापन यंत्रणा पुढे नेण्याचे कार्य करणार आहेत. कोविड-19 साथीच्या रोगाला प्रतिसाद म्हणून, यूएसएआयडी आणि एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) यांनी संयुक्तपणे आरोग्यपूर्ण आणि ऊर्जा कार्यक्षम इमारतींसाठी "सुरक्षा आणि कार्यक्षमतेसाठी वायु गुणवत्ता सुधारण्यासाठी जुनी वातानुकूलन यंत्रणा" (RAISE) बदलण्याची एक नवीन क्रिया सुरू केली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी सुरुवातीला सार्वजनिक क्षेत्रातील इमारतींमध्ये केली जाईल.

 

ऊर्जा व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे

एसईपीची स्थापना झाल्यापासून द्विपक्षीय हायड्रोकार्बन व्यापारामध्ये लक्षणीय वृद्धी निदर्शनाला आली आहे, 2017-18 पासून 93 टक्क्यांच्या वृद्धीसह 2019-20 दरम्यान द्विपक्षीय हायड्रोकार्बन व्यापार 9.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचला आणि उभय देशांनी त्यादरम्यान हायड्रोकार्बन व्यापारास अधिकाधिक प्रोत्साहन देण्याबाबत सहमती दर्शविली.

अमेरिका-भारत नैसर्गिक वायू कृती दलाच्या माध्यमातून अमेरिका आणि भारतीय उद्योगांनी नवीन प्रकल्पांवर नवीन व्यावसायिक भागीदारी स्थापन केली आणि भारताच्या उर्जा क्षेत्रात नैसर्गिक वायूचा वाटा वाढविण्यासाठी तसेच भारत सरकारच्या दृष्टिकोनास पाठिंबा देण्यासाठी धोरणात्मक आणि नियामक शिफारसींची मालिका विकसित केली. ऊर्जा क्षेत्रातील व्यापार आणि गुंतवणूकीच्या आव्हानांवर आणि संधींबद्दल उद्योग दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी उभय पक्षांनी अनेक सार्वजनिक-खाजगी चर्चा सत्र देखील आयोजित केले आहेत.

उभय पक्षांनी आमच्या नागरी अणु सहकार्यास पुढे आणण्यासाठी संबंधित सरकारांनी दृढ वचनबद्धता दर्शविली आणि वेस्टिंगहाउस वाणिज्यिक अणुभट्टी प्रकल्पावरील नुकत्याच झालेल्या प्रगतीचे स्वागत केले जे आपल्या धोरणात्मक संबंधातील महत्त्वपूर्ण टप्प्याचे प्रतिनिधित्व करते.

ऊर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीकोनातून एकमेकांना पाठबळ देण्यास आणि गुंतवणूकीस प्रोत्साहित करण्यासह उभय पक्षांनी सहमती दर्शविली ज्यात दोन्ही बाजूंच्या कंपन्यांना गुंतवणूकीसाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते.

 

सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे

उभय पक्ष दीर्घकालीन उर्जा विकास आणि उर्जा डेटा व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धती आणि कार्यप्रणालीचा अवलंब करून योजना आणि धोरण वाढविण्यासाठी; उर्जा मॉडेलिंगमध्ये क्षमता वाढविणे आणि कमी कार्बन तंत्रज्ञानाची जाहिरात करणे यासाठी कार्य करीत आहेत. थिंक टॅंक, धोरण संशोधक, स्वयंसेवी संस्था आणि भारतातील सरकारी संस्था डीओई राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि संबंधित अमेरिका सरकार आणि खाजगी संस्थांसमवेत वरील उपक्रमासाठी सहकार्य करतील. यूएसएआयडी आणि नीती आयोगाने मॉडेलिंग वर्किंग नेटवर्कचे जाळे तयार करण्यासाठी आणि विश्लेषणात्मक काम आणि धोरणनिर्मितीसाठी सरकारसोबत संयुक्तपणे इंडिया एनर्जी मॉडेलिंग फोरम सुरू केले.

 

ऊर्जा क्षेत्रात महिला सबलीकरण

ऊर्जा नवोन्मेषाला पाठिंबा देण्यासाठी आणि भविष्यातील प्रमुख उर्जा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विविध कौशल्य संचांसह अधिक संतुलित कार्यशक्तीची आवश्यकता असल्याचे मान्य करून मंत्र्यांनी एसईपी व्यासपीठाच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्धता दर्शविली. यूएसएआयडीने उर्जा क्षेत्रावर लक्ष केंद्रित दक्षिण आशिया महिला ऊर्जा (सॅव्हीआयई) मंच सुरू केला आणि तांत्रिक स्तंभांमध्ये लिंग-केंद्रित उपक्रम समाविष्ट करण्यासाठी उभय पक्ष कार्यरत आहेत.

सहकार्याच्या संबंधित स्तंभांसाठी कृती योजना विकसित करण्यासाठी नजीकच्या काळात धोरणात्मक उर्जा भागीदारी कार्यसंघाची बैठक आयोजित केली जाईल. मंत्रिपदाची पुढील बैठक 2021 मध्ये होईल.

 

* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1639639) Visitor Counter : 418