वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पीयूष गोयल यांनी देशातील मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठ्याचा घेतला आढावा


देशात मेडिकल ऑक्सिजनची पुरेशी उपलब्धता, उत्पादन, पुरवठा आणि साठवण क्षमता

Posted On: 17 JUL 2020 8:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जुलै 2020

कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज देशातील मेडिकल ऑक्सिजन पुरवठा आणि साठवण क्षमता विस्तारासंबंधी आढावा घेतला. उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभाग (डीपीआयआयटी) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिका्यांनी माहिती दिली की, आतापर्यंत मेडिकल ऑक्सिजनच्या निर्मिती, साठवण, वाहतूक आणि पुरवठ्यात कोणतीही मोठी समस्या आढळली नाही. एप्रिल 2020 मध्ये मेडिकल ऑक्सिजनचा वापर प्रतिदिन 902 मेट्रिक टन होता आणि 15 जुलैपर्यंत मेडिकल ऑक्सिजन वापरात 1512 मेट्रिक टन प्रतिदिन एवढी वाढ झाली.  सध्या देशात 15 हजार मेट्रिक टनपेक्षा जास्त साठा आहे.

या महिन्याच्या अखेरीस आवश्यकतेच्या अंदाजाच्या तुलनेत मेडिकल  ऑक्सिजनचे सध्याचे उत्पादन आणि पुरवठा याची एकूण स्थिती सर्व राज्यांमध्ये समाधानकारक असल्याचे निदर्शनाला आले आहे. राज्ये, महानगरे आणि जिल्ह्यांमध्ये, जेथे सक्रिय रुग्ण  मोठ्या प्रमाणात आहेत, तेथे पुरवठा व साठवण करण्याची स्थिती पुरेशी आहे. त्याचप्रमाणे दुर्गम ठिकाणी मेडिकल ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. हे अधोरेखित केले गेले की ऑक्सिजनवरील एकूण कोविड-19 प्रकरणांची टक्केवारी काल कमी होऊन 4.58% झाली आहे. 1 मार्च 2020 रोजी 5938 मेट्रिक टन इतकी मेडिकल ऑक्सिजन साठवण क्षमता होती, त्यात 10% वाढ केली जात आहे.

सिलेंडर्स आणि क्रायोजेनिक व्हेसल्सचे सर्व प्रमुख उत्पादक आता सरकारी ई-मार्केटप्लेस (जीईएम ), सार्वजनिक खरेदी पोर्टलवर नोंदणीकृत आहेत. मेडिकल ऑक्सिजन जनरेटरचे उत्पादक देखील नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

पीयूष गोयल म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत किंवा अचानक मागणीत वाढ झाल्यास पुरेशी व्यवस्था असावी. हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे या काळात जिथे संपर्क तुटू शकतो, अशा ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी असे  निर्देश  त्यांनी दिले.

 

S.Thakur/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1639458) Visitor Counter : 185