रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
ई-ऑफिसद्वारे शुल्क सूचना प्रकाशित करण्याविषयीची प्रक्रिया व अनिवार्य नमुना यादी भरण्याविषयी मानक कार्यप्रणाली-'एसओपी' बाबतची अधिसूचना रस्ते वाहतूक मंत्रालयाने केली जारी
Posted On:
08 JUL 2020 7:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2020
रस्ते वाहतूक मंत्रालयाने, ई-ऑफिसद्वारे शुल्क सूचना प्रकाशित करण्याविषयीची प्रक्रिया व अनिवार्य नमुना यादी भरण्याविषयी मानक कार्यप्रणाली-'एसओपी' बाबतची अधिसूचना आज जारी केली आहे.
ही प्रक्रिया आजपासून त्वरीत व परिणामकारक पध्दतीने लागू होईल. बांधा, वापरा व हस्तांतरित करा (BOT), तसेच अभियांत्रिकी संपादन व बांधकाम (EPC) यातील प्रकल्पांसाठीची नमुना यादी देखील यात उपलब्ध आहे.
शुल्क भरण्यासाठी सर्वत्र समानता प्रस्थापित व्हावी, हा या योजनेचा उद्देश आहे. मंत्रालयाच्या टोल विभागाने ई-ऑफिसद्वारे एकत्रित स्वरुपाची समग्र नमुना यादी तयार केली असून शुल्काबद्दल अधिसूचना आणि प्रत्येक महत्त्वाची, तपशीलवार माहिती यात दिली आहे; असे सर्व प्रस्ताव आता अनिवार्य नमुना यादीनुसार ई-ऑफिस द्वारे, सादर करणे आता बंधनकारक असेल. अर्धवट भरलेल्या बांधकाम प्रकल्प तपशिलामुळे लागणारा कालावधी यामुळे कमी होऊन टोल फी बाबतच्या अधिसूचना त्वरेने जारी करता येतील.
S.Pophale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1637339)
Visitor Counter : 176