रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उत्तम प्रतीची सेवा देण्यासाठी करणार रस्त्यांचे मुल्यांकन

Posted On: 06 JUL 2020 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली,  6 जुलै 2020

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI), देशभरातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न करण्यासाठी, त्यांचे निकषांनुसार मुल्यांकन करून त्यांचा दर्जा निश्चित करण्याचे ठरवले आहे. ही गुणांकन तपासणी आणि दर्जा देणे याचा उद्देश, रस्ते सुधारण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करून महामार्गावराचा वापर करणाऱ्या प्रवाशांची उत्तम सेवा करणे हा आहे.

या कामगिरीचे मुल्यांकन करण्याचे मापदंड, विविध आंतरराष्ट्रीय पध्दती आणि यावर अवलंबून असून आपल्या देशाच्या संदर्भात त्या कार्यपध्दतींचा अभ्यास करून ठरविले जातील. महामार्ग कार्यक्षमता (45%), महामार्ग सुरक्षा (35%)  आणि उपभोक्ता सेवा ( 20%) अशा तीन व्यापक निकषांवर प्रामुख्याने त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. या मूल्यांकनाच्या परिणामाचे सर्वसमावेशक विश्लेषण करून प्राधिकरण रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी विविध उपाय करण्यासंदर्भात निर्णय घेईल.

याबरोबरच वाहनांची गती, प्रवेश नियंत्रण, टोलप्लाझा वर लागणारा वेळ, रस्त्यांवरची चिन्हे आणि सूचना, अपघातांची वारंवारिता, घटना प्रतिसाद कालावधी, अपघात विरोधी अडथळे, पथदिवे, प्रगत रहदारी व्यवस्थापन प्रणाली (एटीएमएस), रचनात्मक कार्यक्षमता, विभाजन छेदनबिंदूच्या श्रेणींची उपलब्धता, स्वच्छता, वृक्षारोपण, रस्त्यांच्या बाजूला असलेल्या सुविधा, ग्राहक समाधान या महत्त्वाच्या बाबींचा समावेश देखील हे मूल्यांकन करताना केला जाईल.

प्रत्येक मार्गिकेला मिळालेल्या मापदंडांच्या गुणसंख्येचा उपयोग अभिप्राय मिळविण्यासाठी होऊन उच्च दर्जाची सेवा, अधिक सुरक्षितता आणि प्रवाशांना येणारा अनुभव सुधारण्यासाठी चांगली कार्यप्रणाली  विकसित करण्यासाठी होईल. याचा उपयोग, एनएचएआयच्या इतर प्रकल्पातील डिझाईन्स, मानके ,मार्गदर्शक तत्वे करारनामे यामधील अंतर ओळखून ते भरून काढण्यासाठीसुद्धा होईल.

या मार्गिकांचे मूल्यांकन त्यांची गतिमानता वाढवेल आणि त्यामुळे त्या मार्गिकांच्या सवलतींचे ठेकेदार /कंत्राटदार/ चालक यांनाही त्यांच्या सेवा सुधारण्यासाठी संधी उपलब्ध होऊ शकेल. या मार्गिकांच्या दर्जा देण्या व्यतिरिक्त बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (BOT), हायब्रीड ऍम्युनिटी मॉडेल, इंजिनीअरींग प्रॉक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (EPC) या प्रकल्पांचेसुद्धा असेच मूल्यमापन करण्यात येईल. या गुणांकनामुळे रस्त्यांची कार्यक्षमता सुधारून त्यांच्या देखभालीचा दर्जा उंचावेल.

 
* * * 

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1636846) Visitor Counter : 213