इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

पंतप्रधानांचे डिजिटल इंडिया-'आत्मनिर्भर भारत'चे स्वप्न साकार करण्यासाठी ईलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय- नीती आयोगाने डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारत अॅप नवोन्मेष आव्हान केले सुरू


ॲप नवोन्मेष आव्हानाच्या ट्रॅक 1 मध्ये विद्यमान ॲप्सना प्रोत्साहन

आव्हानाच्या ट्रॅक 2 मध्ये नवीन अॅप्सच्या विकासावर लक्ष केंद्रित

Posted On: 04 JUL 2020 7:17PM by PIB Mumbai

 

भारतीय अॅप्सला पाठबळ देण्यासाठी व एक मजबूत परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने, ईलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नीती आयोगाच्या अटल नवोन्मेष अभियानासोबत भारतीय तंत्रज्ञान उद्योजक व स्टार्टअपसाठी डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारत अॅप आव्हान सुरु केले आहे. या आव्हानामुळे डिजिटल इंडिया उभारण्याच्या दृष्टीने व आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीची जाणीव होण्यासाठी सहाय्य होईल.

हे 2 ट्रॅकमध्ये चालू होईल: विद्यमान अॅप्सना प्रोत्साहन आणि नवीन ॲप्सचा विकास.

आज सुरू करण्यात आलेल्या ट्रॅक 1 अॅप नवोन्मेष आव्हानाचे लक्ष्य आहे, आधीपासूनच नागरिकांकडून वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट भारतीय अॅप्सची व त्या संबंधित श्रेणीमध्ये त्या ॲप मध्ये जागतिक दर्जाचा ॲप बनण्याची क्षमता आहे का, याची चाचपणी करणे. लीडर बोर्डवरील ॲप्स दर्शविणारे विविध रोख पुरस्कार आणि प्रोत्साहनपार बक्षिसे हे नाविन्यपूर्ण आव्हान एक पर्यावरणीय प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न करेल जिथे भारतीय उद्योजक व स्टार्टअप्सना तंत्रज्ञानाचे निराकरण, इनक्युबेट, निर्मिती, संगोपन आणि शाश्वत ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, ज्यामुळे केवळ भारतातीलच नव्हे तर, जगभरातील नागरिकांनाही सेवा प्रदान करणे शक्य होईल. भारत आणि जगासाठी 'मेक इन इंडिया' हा मंत्र आहे. हे एका महिन्यात पूर्ण होईल.

या ॲप नवोन्मेष आव्हानासोबतच सरकार आत्मनिर्भर भारत अॅप नवोन्मेष आव्हानाचा ट्रॅक 2 देखील सुरू करणार आहे. जे भारतीय स्टार्ट अप्स / उद्योजक / कंपन्याची निवड करून त्यांना कल्पनाशक्ती, इनक्युबेशन, प्रारूप व अॅप्लिकेशन लागू करण्यासाठी प्रोत्साहित करेल. हा ट्रॅक प्रदीर्घ काळासाठी चालेल, त्यासंबंधीचा तपशील स्वतंत्रपणे प्रदान केला जाईल.

आत्मानिर्भर भारत अॅप नवोन्मेष आव्हान ट्रॅक 1 खालील 8 विस्तृत श्रेणींमध्ये सुरू करण्यात आला आहे.

1.ऑफिस कार्यक्षमता आणि घरून काम करणे

2.सोशल नेटवर्किंग

3.ई-लर्निंग

4.करमणूक

5.आरोग्य आणि निरोगीपणा

6.ॲग्रीटेक आणि फिन-टेकसह व्यवसाय

7.बातम्या

8.खेळ

प्रत्येक श्रेणीत अनेक उप श्रेणी असू शकतात.

नवोन्मेष आव्हान 4 जुलै 2020 पासून innovate.mygov.in/app-challenge उपलब्ध असेल. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2020 आहे. माय जीओव्ही पोर्टल - www.mygov.in  या संकेत स्थळावर नोंदणी आणि लॉग इन करुन अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता आहे.

खाजगी क्षेत्र आणि शैक्षणिक तज्ञांसह प्रत्येक ट्रॅकसाठी नेमलेले विशिष्ट परीक्षक (ज्युरी) प्राप्त प्रवेशिकांचे मूल्यांकन करतील. निवड केलेल्या ॲप्सना पुरस्कार देण्यात येणार असून नागरिकांच्या माहितीसाठी हे ॲप्स लीडर बोर्डवर दर्शविले जातील. सरकार योग्य ॲप्सचा अवलंब करून त्यातील सुधारणांसाठी मार्गदर्शन करेल आणि शासकीय ई-मार्केटप्लेस (जीएम) वर अशा ॲप्सची यादी करेल.

काही महत्त्वाच्या मूल्यांकन मापदंडांमध्ये सुलभ वापर (यूआय / यूएक्स), मजबुती, सुरक्षा आणि स्केलेबिलिटी समाविष्ट असेल.

****

S.Pophale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1636498) Visitor Counter : 258