आदिवासी विकास मंत्रालय

प्रयागराज विमानतळावर ट्राइब इंडिया विक्री केंद्र सुरु


ट्राइब इंडियाने आपल्या किरकोळ विक्री केंद्राचा विस्तार करत देशभरात 121 विक्री केंद्र केली सुरु

Posted On: 01 JUL 2020 8:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जुलै 2020

 

आदिवासी व्यवहार मंत्रालयांतर्गत कार्यरत ट्रायफेडच्या ट्राइब इंडिया विक्री केंद्राचे आज प्रयागराज विमानतळावर द्‌घाटन करण्यात आले. प्रयागराज विमानतळावरील ट्राइब इंडिया विक्री केंद्र हे प्रयागराज शहरातील दुसरे आणि उत्तरप्रदेश राज्यातील चौथे विक्री केंद्र आहे. ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या केंद्राचे द्‌घाटन केले. ट्रायफेडने भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने चेन्नई, जयपूर, उदयपूर, कोईम्बतूर, त्रिवेंद्रम, अहमदाबाद, पुणे, कोलकाता आणि गोवा या विमानतळांवर 9 ट्राइब इंडिया दुकानांची स्थापना केली असून त्यांचे परिचालन उत्तम प्रकारे सुरु आहे. प्रयागराज विमानतळावर नव्याने द्‌घाटन करण्यात आलेले हे विक्री केंद्र विमानतळांवरील 10 वे विक्री केंद्र असून देशातील 121वे विक्री केंद्र आहे.

या प्रसंगी बोलताना प्रवीर कृष्णा यांनी हा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संपूर्ण टीमचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले - हे दुकान मे 2020 मध्ये देण्यात आले होते आणि ते अवघ्या 15 दिवसात सुरु झाले! संपूर्ण टीमचे समर्पण आणि परिश्रमाबद्दल त्यांचे कौतुक करतानाच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिलेले सहकार्य व पुढाकार घेतल्याबद्दल भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय संचालक सुनील यादव यांचे आभार मानले. या उदाहरणाचा दाखला देत त्यांनी इतर प्रांतातील अन्य ट्रायफेड योद्धांना प्रोत्साहित केले आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत सरकारी मालकीच्या सर्व विमानतळांमध्ये ट्राइब इंडियाची विक्री केंद्र सुरु होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी ट्रायफेड योद्धांना आपापल्या क्षेत्रातील सर्व पुरवठादार व कारागीरांशी संपर्क साधून या मंचावर त्यांना एकत्रित आणण्यासाठी प्रोत्साहित केले जेणेकरून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये स्थान मिळेल.

पंतप्रधानांच्या व्होकल फॉर लोकल या संदेशाला प्रतिसाद देत आणि विपणनाद्वारे आदिवासी कारागीरांच्या उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रायफेडने या आव्हानात्मक परिस्थितीतही आपल्या किरकोळ विक्री केंद्रांचा देशभर विस्तार करण्याचे कार्य सुरूच ठेवले आहे. साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे आदिवासी लोकांची सर्व व्यावसायिक कामे ठप्प झाली असताना आणि 100 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या मालाची विक्री झाली नसताना त्यांचे हे संकट कमी करण्यासाठी, आदिवासी व्यवहार मंत्रालया अंतर्गत कार्यरत ट्रायफेड घरी काम करणारे कामगार आणि आदिवासी कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहे. ई-बाजारपेठेचा विकास हा सर्वात महत्वाचा उपक्रम आहे ज्यामध्ये 5 लाखांहून अधिक आदिवासी कारागीर थेट या पोर्टलवर आपले नावाची  नोंदणी करू शकतील आणि त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकतील.

या उत्पादनांच्या विक्रीसाठी ट्रायफेडने आपल्या व्यापक रिटेल नेटवर्कचा उपयोग केला आहे असे नव्हे तर विक्रीतील 100% रक्कम आदिवासी कारागीरांना हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना खरेदीचा उत्तम अनुभव प्रदान करण्यासाठी, ट्राइब इंडियाच्या प्रादेशिक कार्यालयांनीही घरोघरी उत्पादनांची वितरण व्यवस्था केली आहे. ई-कॉमर्स व्यासपीठाचा लाभ घेण्यासाठी ट्राईब इंडियाची सर्व उत्पादने www.tribesindia.comवर उपलब्ध आहेत. अ‍ॅमेझॉन, फ्लीपकार्ट, स्नॅपडील, पेटीएम आणि जेएम (GeM) याच्यासह सर्व ई-कॉमर्स व्यासपीठांवर सर्व प्रकारच्या वस्तू आणि भेटवस्तू सहजरित्या मिळतील हे सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रादेशिक केंद्र एकत्रितपणे काम करत आहेत. ट्राइब इंडियाच्या ई-कॉमर्स व्यासपीठावर आणि किरकोळ दुकानांमधील सर्व उत्पादनांवर 70% सवलत दिली जात आहे. देशभरातील आदिवासींच्या हिताचे रक्षण व संरक्षण करण्याच्या दृष्टीने ट्रायफेड कार्य करत आहे.

 

S.Thakur/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1635847) Visitor Counter : 187