मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

केंद्रीय मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्री, गिरीराज सिंह यांनी "मत्स्य संपदा" या मत्स्यपालन आणि जलचर विषयीच्या बातमीपत्राच्या पहिल्या आवृत्तीचे केले प्रकाशन


पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेची कार्यान्वयन मार्गदर्शक सूचना जारी करुन गिरीराज सिंह यांनी आशा व्यक्त केली की पंतप्रधान मत्स्य संपदा योजना मत्स्यपालन मूल्य शृंखलेसह मत्स्यपालन व जलचर क्षेत्रात क्रांती घडवून आणेल

Posted On: 30 JUN 2020 7:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2020

 

भारत सरकारच्या मत्स्योत्पादन मंत्रालयाचा मत्स्यव्यवसाय विभाग, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय यांनी प्रकाशित केलेल्या "मत्स्य संपदा" या मत्स्यपालन आणि जलचर विषयी बातमीपत्राच्या पहिल्या आवृत्तीचे तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या (पीएमएमएसवाय) कार्यकारी मार्गदर्शक तत्वांचे उदघाटन केंद्रीय मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्री, गिरीराज सिंह यांनी आज केले. मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी, भारत सरकारच्या मत्स्यपालन विभागाचे सचिव डॉ राजीव रंजन आणि मत्स्योत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मत्स्य विभागातील बातमीपत्र "मत्स्य संपदा" ही मत्स्योत्पादन विभागाच्या प्रयत्नांची परिणती आहे ज्यात विशेषतः मच्छीमार व मासेमारी करणाऱ्या हितधारकांशी संवादाच्या विविध माध्यमांद्वारे संपर्क साधणे आणि मत्स्य पालन व जलचर क्षेत्रातील ताज्या घडामोडींविषयी त्यांना माहिती देणे व शिक्षित करणे या गोष्टी अभिप्रेत आहेत. 2020-21 वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून प्रत्येक तीन महिन्यांनी ते प्रकाशित केले जाईल.

याप्रसंगी बोलताना माननीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांनी मत व्यक्त केले की या बातमीपत्राचे प्रकाशन वेळेवर करण्यात आले असून मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील सरकारी उपक्रमांविषयी संवाद साधण्याची खूप गरज आहे ज्यात सरकार तसेच खाजगी क्षेत्र दोघांनीही चांगले  काम केले आहे. हे वृत्तपत्र देशभरातील हितधारक, विशेषत: मत्स्यपालक, मत्स्यपालक शेतकरी, तरुण आणि उद्योजक यांच्यात माहिती पोहोचविण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी आणि व्यवसाय करण्यास सुलभ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून काम करेल. हे वृत्तपत्र संवादासाठी एक अद्भुत व्यासपीठ असल्याचे सिद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेची कार्यान्वयन मार्गदर्शक सूचना जारी करताना गिरीराज सिंह यांनी पीएमएसवायवायची सुरुवात ही मत्स्यपालन व जलचरांच्या विकासाच्या प्रवासातील सर्वात महत्वाचा क्षण असल्याचे म्हटले. मत्स्यपालन मूल्य शृंखलासह विविध हस्तक्षेप असलेली प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना  मत्स्यपालन आणि जलचर क्षेत्रात क्रांती घडवून आणून पुढील टप्प्यावर पोहोचवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या योजनेची कार्यान्वयन मार्गदर्शक सूचना अल्पावधीत जारी केल्याबद्दल मत्स्यविकास  विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक करीत असताना, केंद्रीय मंत्र्यांनी आशा व्यक्त केली की या योजनेच्या अंमलबजावणीत राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांना कार्यान्वयन मार्गदर्शक तत्त्वे मदत करतील.

भारत सरकारने मे 2020 मध्ये मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या शाश्वत आणि जबाबदार विकासासाठी 20050 कोटी रुपये गुंतवणुकीची नवीन पथदर्शी योजना म्हणजेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमवायवाय) सुरु केली. 100 विविध उपक्रमांचा समावेश असलेली प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. या योजने अंतर्गत अतिरिक्त 70 लाख टन मत्स्य उत्पादन, एक लाख कोटी रुपये किमतीची मत्स्यव्यवसायातील निर्यात, पुढच्या पाच वर्षांत 55 लाख रोजगार निर्मिती इत्यादी महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकार आणि हितधारक यांच्यात सहयोगात्मक आणि एकत्रित प्रयत्नांसह बहुविध रणनीती आवश्यक आहे. "मत्स्य संपदा" हे वृत्तपत्र प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या हेतू आणि पुढाकाराचा प्रसार करण्यासाठी एक प्रभावी साधन आणि व्यासपीठ म्हणून काम करेल जे कल्पित उद्दीष्टांपर्यंत पोहोचण्याच्या दिशेने एकत्रित प्रयत्नात लोकांचे मत निर्णायक ठरू शकेल. हे मच्छीमार आणि मत्स्यपालक शेतकरी आणि उद्योजकांनी केलेल्या नवीन घडामोडींसह, त्यांच्या यशोगाथांसह मत्स्यपालन आणि जलचर यातील उत्कृष्ट पद्धती दर्शविण्यास सक्षम करेल.

 

* * * 

G.Chippalkatti/V.Joshi/D.Rane(Release ID: 1635422) Visitor Counter : 139