रसायन आणि खते मंत्रालय
‘एनएफएल’च्या वतीने मृदा परीक्षणासाठी फिरती प्रयोगशाळा सुविधा
शेतकऱ्यांच्या दारात मृदा नमुन्यांचे मोफत परीक्षण करण्याची सोय
प्रविष्टि तिथि:
29 JUN 2020 9:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जून 2020
शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये योग्य प्रमाणात खतांचा वापर करावा, त्याचबरोबर देशामध्ये मृदा परीक्षण मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘एनएलएफ’ म्हणजेच 'नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड'च्या वतीने फिरत्या मृदा परीक्षण प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. देशभरात सध्या अशा पाच वाहनांच्या माध्यमातून फिरत्या मृदा प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या फिरत्या प्रयोगशाळांमुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या दारामध्ये मृदा तपासणी करण्याची मोफत सुविधा मिळणार आहे.


‘एनएफएल’च्या नोएडा इथल्या कार्यालयाबाहेर आज संस्थेचे कार्यकारी संचालक व्ही. एन. दत्त आणि इतर वरिष्ठ अधिका-यांनी या फिरत्या प्रयोगशाळेच्या वाहनाला झेंडा दाखवून या योजनेचा प्रारंभ केला.
या फिरत्या प्रयोगशाळेमध्ये मृदा नमुन्यांचे परीक्षण करण्यासाठी सर्व आधुनिक उपकरणे आहेत. या परीक्षणातून मातीमध्ये असलेले समग्र व सूक्ष्म पोषक तत्वे यांचे विश्लेषण होऊ शकणार आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना विविध कृषी कार्यासंबंधी माहिती देणारी ध्वनिचित्रफीत दाखवणारी यंत्रणा उपलब्ध असणार आहे.
या फिरत्या मृदा परीक्षण प्रयोगशाळांव्यतिरिक्त देशात विविध ठिकाणी असलेल्या स्थिर मृदा परीक्षण प्रयोगशाळांच्या माध्यमातून नियमित सेवा देण्यात येणार आहेत. या सर्व प्रयोगशाळांमध्ये वर्ष 2019-2020 मध्ये जवळपास 25,000 मातींच्या नमुन्यांचे मोफत परीक्षण केले आहे.
S.Pophale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1635215)
आगंतुक पटल : 223