गृह मंत्रालय
कोरोनाविरूद्धच्या लढाईत संपूर्ण देश पंतप्रधानांच्या पाठीशी उभा आहे: गृहमंत्री अमित शहा
दिल्लीतील काही घटनांमुळे लोकांमध्ये भीती आणि अनिश्चितता निर्माण झाली, आमच्या प्रयत्नांमुळे दिल्लीची परिस्थिती सुधारेल; 31 जुलैपर्यंत 5.5 लाखांच्या पुढे बाधित रुग्णांचा आकडा जाणार नाही
दिल्ली सामुदायिक संक्रमणाच्या टप्प्यावर पोहोचलेली नाही, जूनच्या सुरुवातीच्या तुलनेत आज दिल्लीतील परिस्थिती चांगली आहे, जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही
केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्लीत नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार उपचार खर्च जवळपास दोन तृतीयांशने कमी केला आहे
चाचणी चार पटीने वाढवण्यात आली असून खाटांची उपलब्धता 14 जून रोजी 9,500 होती, ती 30 जूनपर्यंत जवळपास 30,000 वर जाईल
आम्ही दिल्लीसाठी 10,000 पल्स ऑक्सीमीटर, 440 व्हेंटिलेटर आणि 500 ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवले आहेत; तसेच दिल्लीसाठी अधिक रुग्णवाहिका पुरवण्याचे निर्देश दिले आहेत
दिल्ली एनसीआरमधील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लवकरच सामायिक धोरण आखणार
Posted On:
28 JUN 2020 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “मोदी सरकार कोविड परिस्थिती अत्यंत योग्य प्रकारे हाताळत आहे आणि दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आहे”. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा म्हणाले “दिल्लीत सामुदायिक संक्रमण झालेले नाही आणि चिंता करण्याचे कारण नाही”.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, दिल्लीची परिस्थिती वाईट आहे व जुलै अखेर राजधानी दिल्लीत कोविड बाधितांची संख्या 5.5 लाखांपर्यंत वाढेल. त्यामुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.” अमित शहा म्हणाले की, "साधारणपणे कोविड परिस्थितीशी सामना करण्याची जबाबदारी दिल्ली सरकारची आहे, परंतु उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रयत्नामध्ये समन्वय आणण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला."
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अमित शहा म्हणाले कि, त्यांनी 14 जून रोजी समन्वय बैठक बोलावली होती जेणेकरुन केंद्र सरकार दिल्ली सरकारला परिस्थितीशी सामना करण्यात मदत करू शकेल. आता अधिक चाचणी केल्या जात असल्यामुळे संक्रमण दर उंचावला आहे, परंतु याचा एक फायदा असा आहे की, ज्यांची चाचणी घेण्यात आली आणि जे बाधित आढळले आहेत, त्यांना विलगीकरणात ठेवले जाईल, ज्यामुळे संक्रमणाचा प्रसार रोखण्यास मदत होईल.
निर्णय
|
तेव्हा
|
आत्ता
|
चाचण्यांमध्ये अनेक पटीने वाढ एकूण चाचण्या: 4.15 लाख
|
25 मार्च ते 14 जून दरम्यान एकूण चाचण्या 2,41,000 म्हणजेच 82 दिवसात 2.41 लाख चाचण्या
|
15 ते 25 जून दरम्यान केलेल्या चाचण्या =1,75,141
म्हणजेच केवळ 11 दिवसात 1,75,141 चाचण्या
दररोज 16,000 पेक्षा अधिक चाचण्या
|
कोरोना चाचणीचा खर्च
|
अंदाजे 5000 रुपये
|
2400 रुपये / चाचणी
तसेच 200 रॅपिड अँटीजेन चाचणी केंद्र देखील स्थापन
|
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी 'एलएनजेपी' रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान प्रत्येक वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, आहार देण्यात खंड पडू नये म्हणून दुय्यम कॅन्टीनची तरतूद, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानसिक -सामाजिक समुपदेशन, तसेच प्रत्यक्ष खाटांच्या स्थितीची माहिती यासारखी विविध पावले उचलण्यात आली. डॉक्टरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यामुळे भविष्यातील रणनीती आखण्यासाठी माहिती मिळाली.”
अमित शहा म्हणाले, "14 जून रोजीच्या 9,937 खाटांच्या तुलनेत आज 30,000 खाटा उपलब्ध आहेत. परिणामी, जूनच्या सुरुवातीला जी परिस्थिती होती, त्या तुलनेत आज दिल्लीतील परिस्थिती बरीच चांगली आहे.” केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “दिल्लीतील सर्व प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये घराघरांमधील सर्वेक्षण 30 जूनपर्यंत पूर्ण होईल. याशिवाय, 'सेरोलॉजिकल' सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे.” अमित शहा म्हणाले की, संसर्ग होण्यापूर्वी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दिल्ली सरकार आणि 'एमसीडी'च्या सहकार्याने प्रयत्न सुरू केले आहेत. दिल्ली अद्याप सामुदायिक संक्रमणाच्या टप्प्यावर पोहोचली नाही, याचा पुनरुच्चार करत ते म्हणाले की, चाचणीचे प्रमाण वाढवले जात आहे, घाबरून जाण्याची गरज नाही.
दिल्ली सरकार द्वारा संचालित रुग्णालयांमध्ये बाह्य रूग्णांवर उपचार करण्यास दिल्ली सरकारने बंदी जाहीर केली होती. अमित शहा म्हणाले, “दिल्ली ही राष्ट्रीय राजधानी आहे. वेगवेगळ्या राज्यातून लोक येथे उपचारासाठी येतात. प्रत्येकाला योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने केंद्र सरकारने हा निर्णय रद्द केला आहे. ”
|
तेव्हा
|
आता
|
खाटांची उपलब्धता
|
14 जून पर्यंत 9,937 खाटा उपलब्ध
|
30 जूनपर्यंत 30000 खाटा उपलब्ध केल्या जातील 503 रेल्वे डब्यांद्वारे अतिरिक्त 8000 खाटा डीआरडीओचे 250 आयसीयू व्हेंटीलेटर्ससह 1000 खाटांच्या रुग्णालयाचे आणि 'सीएपीएफ'च्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांद्वारे व्यवस्थापन (2 जुलै रोजी कार्यान्वित होणार) राधा स्वामी आश्रम येथील 10000 खाटांच्या कोविड सुविधेचे 'आयटीबीपी'कडून व्यवस्थापन
|
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “यापूर्वी अंतिम संस्कार योग्य पद्धतीने केले जात नव्हते, म्हणून दिल्ली सरकारबरोबर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, रुग्णालयात पडून असलेल्या सर्व मृतदेहांचे अंत्यसंस्कार दोन दिवसांच्या आत त्यांच्या धार्मिक प्रथेनुसार केले जातील आणि आता या बाबतीत काहीही प्रलंबित नाही. अमित शहा म्हणाले, “खासगी रुग्णालयांमध्ये कोविड-19 उपचारांच्या अवाजवी खर्चामुळे दिल्लीकरांची चिंता वाढली होती. त्यामुळे खाटा आणि उपचाराचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे दिल्लीकरांना दिलासा मिळाला. कोविड-19 महामारी विरूद्ध लढाईत एनसीसी, एनएसएस, स्काउट्स आणि स्वयंसेवी संस्थांना सहभागी करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
दिल्लीतील खासगी रुग्णालयांमधील कोरोना उपचारांच्या खर्चात दोन तृतीयांशने घट करण्यात आली
|
श्रेणी
|
तेव्हा
(पीपीई किट आणि औषधांशिवाय )
|
आता
(पीपीई किट आणि औषधांसह )
|
आयसोलेशन बेड
|
Rs.24000-25000
|
Rs. 8000-10000
|
व्हेंटीलेटरशिवाय आयसीयू
|
Rs.34000-43000
|
Rs.13000-15000
|
व्हेंटीलेटरसह आयसीयू
|
Rs.44000-54000
|
Rs.15000-18000
|
अमित शहा म्हणाले की, कोविड-19 महामारी विरोधात लढा देण्यात केंद्र सरकार यशस्वी ठरले आहे. जागतिक संदर्भांच्या तुलनेत आपली आकडेवारी बरीच बरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या महामारीच्या विरोधातील लढाईत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि देशातील 130 कोटी नागरिक यांच्यात भागीदारी आहे. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, “या लढाईत राष्ट्र एकजुटीने उभे आहे आणि आपल्या कोरोना योद्धयांना सतत प्रोत्साहन देत आहे”. अमित शहा म्हणाले की, 10 लक्ष लोकांमागे जागतिक दर 1,250 आहे तर भारतात संसर्ग दर फक्त 357 आहे. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “आज भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 57 टक्के आहे, तर मार्च महिन्यात ते 7.1 टक्के होते. ”.
प्रति दहा लाख लोकांमध्ये कोविड बाधितांची संख्या
भारत : 357
|
जागतिक सरासरी : 1250
|
अमेरिका : 7,569
|
ब्रिटन : 4,537
|
ब्राझील : 5,802
|
रशिया : 4,254
|
मृत्युदर प्रति 10 लाख लोकांमागे
भारत: 11
|
जागतिक सरासरी: 63.2
|
अमेरिका: 383
|
ब्रिटन: 637
|
ब्राझील : 259
|
रशिया : 60
|
म्हणूनच केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, “विकसित देशांच्या तुलनेत भारताने उत्तम काम केले आहे”. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, “एखाद्या व्यक्तीला अगदी कमी लक्षणे आढळली तरी त्याची चाचणी घ्यावी आणि लोकांमध्ये गंभीर लक्षणे आढळल्यास, त्यांच्या कुटुंबाच्या हितासाठी त्यांना विलगीकरण केंद्रात हलवले पाहिजे. यामुळे कोविड-19 संक्रमण थांबविण्यात मदत होईल.
अमित शहा म्हणाले, “टाळेबंदीच्या घोषणेबरोबरच केंद्र आणि राज्ये यांच्यात चर्चा सुरु होती. जवळपास सर्वच राज्यांनी 2.5 कोटी स्थलांतरितांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. रुग्णालये आणि विलगीकरण सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, 63 लाख स्थलांतरित सुमारे 4,594 रेल्वेगाड्यांमधून मूळ गावी परत गेले. सुमारे 42 लाख स्थलांतरितांनी विविध प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गाने प्रवास केला आणि एकूण 1.20 कोटी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. अमित शाह म्हणाले, “नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थलांतरितांसाठी रोजगार योजना जाहीर केली. स्थलांतरितांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. मनरेगा अंतर्गत मजुरी वाढविण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “ महामारी सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लगेचच अनेक सुधारणांची घोषणा करण्यात गेली. या सुधारणांमुळे दीर्घकालीन लाभ मिळतील. साथीच्या आजारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम कमी करण्यासाठी विविध पावले उचलली गेली आहेत. मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था अजूनही चांगली स्थितीत आहे."
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील लोकांना लक्षणे आढळल्यास जवळच्या चाचणी केंद्रात जाण्याचे आवाहन केले. तसेच जरी त्यांना बाधा झालेले तपासणीत निष्पन्न झाले तरी संस्थात्मक विलगीकरणाची चिंता करू नये. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे आणि संसर्ग थांबविण्यात ते मोठी भूमिका निभावेल.
S.Pophale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1635091)
Visitor Counter : 283