गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील 10,000 खाटा असलेल्या ‘सरदार पटेल कोविड केअर सेंटर’ च्या सज्जतेचा आढावा घेतला
10,000 खाटांचे सरदार पटेल कोविड केअर सेंटर दिल्लीतील लोकांना मोठा दिलासा देईल-अमित शाह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार देशातील नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध
केंद्रीय गृहमंत्र्यांनी या कठीण काळात कोविड देखभाल सुविधा चालवणार्या आयटीबीपी जवानांचे कौतुक केले. “देशाची आणि दिल्लीच्या जनतेची सेवा करण्याची त्यांची कटिबद्धता अद्वितीय "असल्याचे प्रतिपादन
Posted On:
28 JUN 2020 2:51AM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल दिल्लीतील राधास्वामी सत्संग ब्यास येथील 10,000 खाटांच्या ‘सरदार पटेल कोविड केअर सेंटर’ च्या सज्जतेचा आढावा घेतला. “10,000 खाटांचे हे केंद्र दिल्लीकरांना मोठा दिलासा देईल” असे अमित शाह म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “मी आपल्या शूर इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) कर्मचाऱ्यांचे कौतुक करतो, त्यांनी या कठीण काळात या कोविड केअर सुविधा चालू ठेवल्या. देश आणि दिल्लीच्या जनतेची सेवा करण्याची त्यांची कटीबद्धता अद्वितीय आहे. ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार देशातील नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे, यावर अमित शाह यांनी भर दिला.
गृहमंत्र्यांनी राधा स्वामी सत्संग ब्यास आणि ही विशाल कोविड सेवा सुविधा निर्माण करण्यात मदत केलेल्या इतर सर्वांचे आभार मानले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय गृहसचिव, अजय भल्ला आणि दिल्ली सरकारचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
Visited the 'Sardar Patel COVID Care Centre' in Delhi to review its preparedness.
I thank Radha Soami Satsang Beas and all others who helped to create this huge Covid care facility.
This 10,000 bed centre would provide huge relief to the people of Delhi. pic.twitter.com/qB0OrP5vxY
— Amit Shah (@AmitShah) June 27, 2020
I applaud our courageous @ITBP_official personnel, who would be operating this Covid Care facility during these trying times. Their commitment to serve nation and people of Delhi is unparalleled.
Modi govt at the centre is committed to provide all possible help to its citizens. pic.twitter.com/p5RaDomna4
— Amit Shah (@AmitShah) June 27, 2020
***
S.Thakur/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1634956)
Visitor Counter : 327