पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

तात्काळ बॅटरी विनिमयाच्या सुविधेला चंदीगडमध्ये सुरुवात


देशात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची आवश्यकता-धर्मेंद्र प्रधान

Posted On: 26 JUN 2020 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जून 2020

पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक, व्ही. पी.सिंग बदनोर यांच्या समवेत पेट्रोलिअम, नैसर्गिक वायु आणि स्टील खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बॅटरी विनिमयाची जलद देवाणघेवाण करणाऱ्या सेवेचे (QIS) आज चंदीगड येथे उद्घाटन केले. ऑनलाईन समारंभाला पेट्रोलिअम, नैसर्गिक वायु, आणि स्टील मंत्रालयाचे सचिव श्री तरुण कपूर, इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्री. संजीव सिंग, चंदीगड केंद्रशासित प्रदेशातील पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायु मंत्रालयाचे तसेच इंडियन ऑईल समुहाचे अधिकारी उपस्थित होते.

बॅटरीच्या देवाणघेवाणीची ही पध्दत धीम्या गतीने  बॅटरी चार्ज करण्यासाठीउत्कृष्ट असून त्यामुळे  वाहनचालकांचा परिचलन वेळ वाचतो. बॅटरी विनिमयाचे हे प्रारुप सध्या व्यावसायिक विभागासाठी  म्हणजे विजेवर चालणारी वाहने, रिक्षा, विजेवर चालणाऱ्या दुचाकी आणि विजेवर चालणारी कारखान्यात तयार केलेली अथवा कारखान्याबाहेर तयार केलेल्या वाहनांसाठी असेल. इंडियन ऑईलने, निवडक शहरांतल्या आपल्या किरकोळ विक्रीकेंद्रांतून, विजेवर चालणाऱ्या वाहनांकरीता जलद बॅटरी विनिमयाच्या प्रारुपाची सोय करण्याची यंत्रणा उभी करून, माहिती प्राप्त करून बघण्यासाठी, मेसर्स सन मोबिलिटी यांच्या सोबत अबंधनकारक सहकार्य करार केला आहे.  इंडियन ऑईल, आपल्या विजेवर चालणाऱ्या गाड्या, रिक्षा, दुचाकी आणि अ‍ॅटोरिक्षा यांच्यासाठी देशातील निवडक शहरांमधून 20 ते 25 जलद विनिमय स्थानके म्हणजे क्विक इंटरचेंज स्टेशन्स सुरू करून, प्रायोगिक तत्वावर (मालकी हक्काची अद्ययावत गतीशीलता  निरसन  केंद्रे ) स्मार्ट मोबिलिटी पोप्रायटी सोल्युशन्स (SMPLs) उभी करण्याच्या विचारात आहे. सन मोबिलिटी पीटीई लिमिटेड, नवी दिल्ली, गुरूग्राम, बेंगळुरू, चंदीगड, अमृतसर आणि इतर महत्वाच्या शहरांतून 20 क्यूआयएस (QIS) बसवण्याची योजना  आखत आहे. प्रायोगिक तत्वावर चालणाऱ्या आरओ- क्यूआयएसमधे 14 बॅटऱ्या, प्रिलोडेड स्वॅपींग कार्डांसाठी टचस्क्रीन आणि वीज सहाय्यक मीटर असेल. ही क्यूआयएस केंद्रे तीनचाकी वाहन विभागाला एकापेक्षा जास्त ऊर्जेचे स्रोत उपलब्ध करण्यात महत्वाची भूमिका बजावतील आणि त्यायोगे भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सध्या हे पाऊल उचलल्याने ऊर्जाक्षेत्रात सुयोग्य सुधारणा घडून येईल आणि  कार्बन न्यूट्रल संस्कृतीची सुरूवात होईल.

यावेळी बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले, की चंदिगडसारख्या आधुनिक आणि सौंदर्यपूर्ण शहरात इंडियन ऑईल आणि सन मोबिलिटी यांच्या साहचर्यातून प्रायोगिक तत्वावर या सुविधेची सुरूवात होत आहे ,याचा मला आनंद होत आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढवण्याची गरज असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, की आपण आधुनिक तंत्रज्ञानाची शक्ती वापरून विजेवर चालणाऱ्या  वाहनांचे सक्षमीकरण करून , ती योग्य दरात उपलब्ध करून देशाची प्रगती साधायला हवी.  हे माननीय पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या चळवळीच्या दिशेनेसुध्दा उचललेले योग्य पाऊल ठरेल, असेही ते पुढे म्हणाले.

भारताच्या स्वच्छ ऊर्जेच्या वचनबध्दतेबद्दल श्री .प्रधान म्हणाले,की भारत हा प्रत्येक व्यक्तिच्या वापराच्या दृष्टीने प्रदूषणाला हातभार लावत नसला तरी COP-21 शी वचनबध्द असून देशातील प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या दिशेने पर्यावरणपूरक नूतनीकरण ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी BS-VI इंधन, सीएनजी आणि पीएनजीचे जाळे विस्तारणे, बहुसंख्य जनतेला एलपीजी गॅस पुरवठा करणे20% ईथेनॉलचे मिश्रणाचे ध्येय, स्वयंपाकाच्या तेलातून जैविक डिझेल तयार करणे, सौरऊर्जेचा गतीशीलतेसाठी वापर करणे यासारख्या बाबी अंगिकारल्या आहेत.

ऊर्जेच्या वापरात भारत विश्वात तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. आपली ऊर्जेची  गरज वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शासन देशातील सर्व लोकांना ऊर्जेचा यथोचित न्याय करण्यासाठी म्हणजे प्रत्येकाला उचित दराने, सहजपणे आणि सवलतीने स्वच्छ ऊर्जा देण्यासाठी कटीबध्द आहे. भारत यातून जबाबदारीने मार्ग काढत असून पर्यावरण पूरक राहून सर्वांच्या  ऊर्जेच्या गरजेला न्याय मिळेल. आपला समाज महत्वाकांक्षी आहे आणि घरगुती साधनांसाठी आत्मनिर्भर भारताला स्वच्छ, योग्य दराने, बहुस्रोती, बहुआयामी ऊर्जास्रोतांची आवश्यकता आहे.

इंडियन ऑईलने पुढाकार घेऊन, देशातील सर्वात स्वच्छ शहरात सुरू केलेल्या बॅटरी स्वॅपींग सेवेची प्रशंसा करत  मंत्री पुढे म्हणालेयापुढे तेल निर्माण करणाऱ्या कंपन्या केवळ पारंपरिक प्राचीन इंधनाची विक्री न करता सीएनजी, एलएनजी,पीएनजीची किरकोळ विक्री आणि वीजभारस्थानके म्हणून देखील कार्य करतील.

पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक व्ही.पी .सिंग बदनोर यावेळी म्हणाले, विकास करत असताना पर्यावरणाची काळजी घेऊनच समाजाच्या आर्थिक गरजा पूर्ण करायला हव्यात. या उपक्रमाची प्रशंसा केली आणि ते पुढे म्हणाले, की  विजेच्या या स्थानकांमुळे कार्बन ऊत्सर्जन कमी होऊन, ध्वनी आणि हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण राहील तसेच तापमानवाढीला प्रतिबंध होईल. ते पुढे म्हणाले, की गुंतवणूकदारांनी  विजेच्या गतीशीलतेचा स्वीकार करून शहरे स्वच्छ आणि चांगली करण्यात पुढाकार घ्यावा.पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायु मंत्रालयाने पुढाकार घेऊन वायु मजबूतीकरणासाठी  केलेल्या  प्रयत्नांचे कौतुक करत त्याची  (CNG,LPG,PNG) नोंदही त्यांनी आपल्या भाषणात घेतली. त्यांनी इंडियन ऑईलने कोरोना महामारीच्या काळात पुरवठ्यात सातत्य ठेवल्याबद्दल आणि स्थलांतरीत कामगारांना मदत केल्याबद्दल अभिनंदन केले.

S.Thakur/S.Patgoankar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1634661) Visitor Counter : 204